पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा): सैलानी यात्रेत गेल्या दोन दिवसात रायपूर पोलिसांनी १९ खिसेकापूंना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. सैलानी यात्रेत जमलेल्या लाखोंच्या गर्दीचा फायदा घेत खिसेकापू दरवर्षी अनेकांच्या खिशावर डल्ला मारतात. सध्या सैलानी यात्रेत बीड, सोलापूर, अकोला, अमरावती, मूर्तिजापूर, भुसावळ येथील खिसेकापूंच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. यातील १९ खिसेकापूंना ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात रायपूर पोलिसांनी पकडले. यामध्ये विजय शिंदे, सईद बेग नूर बेग, राजू शिंदे, रामदास शिंदे, शे.अयुब शे. इब्राहीम, शे. शेरू शे. कालू, रेखा शिंदे, मोहिनी शिंदे या खिसेकापूंचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहे. ही कारवाई रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम व्यवहारे, राम राजपूत, चंदू राठोड, सुदर्शन ठाकूर, शे. शकील यांनी या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सैलानी यात्रेत १९ खिसेकापूंना पकडले
By admin | Published: March 09, 2015 2:01 AM