विद्युत पुरवठ्यासंदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी मांडण्याकरिता येथील महावितरणच्या कार्यालयात अधिकारीच नसतो. येथील महावितरण कार्यालयाचा कारभार रोजंदारीवरील मुले पाहतात. त्यांना याबाबत जास्त माहिती नाही. विद्युत पुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे अनेक विद्युत ग्राहकांनी कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी जबाबदार अधिकारी मिळून आला नाही. चार दिवसांपासून बंद असलेला विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करावा, यासाठी काही शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात येऊन विचारणा केली असता, दुसरबीड येथील कार्यालयामध्ये कोणी मिळून आले नाही. यासंदर्भात महावितरणचे अधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता, माझ्याकडे माझीच कामे जास्त आहेत, तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करून दुसरबीड येथे जी जेईईची मागणी करा, अशाप्रकारचे उत्तार त्यांनी दिले.
विद्युत पुरवठ्याच्या अडचणी
उन्हाळ्यात सतत खंडित होत असलेला वीजपुरवठा सुरळीत रहावा, कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
भरमसाठ वीजबिलांचा ग्राहकांना शॉक
लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडू शकले नाहीत. अनेकजण आजही घरूनच काम करत असून, कित्येकांना रोजगारही गमवावा लागला आहे. बेरोजगारीमुळे आर्थिक संकट कोसळले असून, या संकटकाळातही महावितरणने भरमसाठ वीजबिले पाठवून जोरदार शॉक दिला आहे.