मनोज पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: शासनाच्या ई-नाम योजनेला प्रभावीपणे राबविण्याकरिता बाजार समिती सज्जतेने प्रयत्नशील आहे; मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत गाव पातळीवर प्रबोधन न झाल्याने त्याबाबत शेतकरी पूर्णत: अनभिज्ञ असून, व्यापारी व अड तेसुद्धा या योजनेपासून अद्यापावेतो अलिप्तच असल्याची बाब कृषी उत्पन्न बाजार समितीत स्पष्ट झाली आहे.शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये अधिकाधिक पारदश्रीपणा यावा, शेतीमालाला चांगला भाव मिळावा तसेच शेतमालाला ऑनलाइन लिलावाद्वारे राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी. या उद्देशाने केंद्र शासनाने ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात ई-नाम ही योजना बाजार समित्यांमार्फत राबविण्याचे धोरण अवलंबिले आहे. या योजनेंतर्गत देशातील बाजार समित्यांमधील शेतमालाचे सौदे ऑनलाइन पद्धतीने काढण्यात येणार आहेत. त्यासाठी शेतकरी आपला शेतीमाल ऑनलाइन पद्धतीवर दाखवून त्यासाठी किंमत जाहीर करू शकेल त्यावर व्यापार्यांकडून बोली बोलून योग्य किंम त मिळाल्यानंतरच शेतकरी संबंधित व्यापाराला शेतीमाल विक्री करणार आहे, अशी ई-नामची संकल्पना असून, ही योजना शेतकर्यांच्या हिताची आहे.महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत बाजार समितीत गेट इंट्री संगणीकृत, गेटवर शे तमालाची नोंदणी, शेतकर्याची नोंदणी उपक्रम राबविल्या जाणार आहे. या दृष्टीने म्हणजेच ही योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सज्ज असून, योजनेबाबत बाजार समितीचे मुख्य प्रशासक साहेबराव पाटील व सचिव राधेश्याम शर्मा कर्मचार्यांना सवरेतोपरी सहकार्य करीत आहेत. मार्गदर्शक सूचना करून सदर योजना प्रभावीपणे राबविल्या जावी म्हणून प्रामाणिकपणे धडपडतही आहेत; मात्र केवळ गाव पातळीवर या योजनेसंदर्भात प्रबोधन न झाल्याने शेतकरी वर्ग या योजनेबाबत अनभिज्ञ असून, व्यापारी व अड तेसुद्धा अलिप्तच आहे.त्यामुळे ही योजना कार्यान्वित होऊन दोन महिने उलटले तरी या योजनेला शेतकरी, व्यापारी व अडत्यांकडून प्रतिसाद मिळणे दुर्लक्ष झाले आहे. प्रबोधनाअभावी या काळात अद्यापपावेतो योजनेत सहभाग म्हणून एकाही शेतकर्याने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत नोंदणी केली नाही. त्यामुळे आता तातडीने याबाबत प्रबोधन करणे गरजेचे झाले आहे. तर कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यावतीने १३ मे १८ नोव्हेंबरदरम्यान नागपूर येथे पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर असून, या शिबिरात योजनेबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्याकरिता बाजार समितीमधील दोन कर्मचारी प्रतवारीकार म्हणून या शिवारात प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग होणार आहेत. जेणेकरून योजना प्रभावीपणे राबविण्यास गती मिळावी हाच त्या मागचा बाजार समितीचा उद्देश आहे.
प्रबोधन शिबिराची गरज ई-नाम योजना अतिशय चांगली योजना असून, शेतकर्यांना चार पैसे मिळवून देणारी आहे. त्यामुळे ही योजना शेतकरी वर्गात रुजविण्याकरिता शासनाने पणन मंडळ, सहकार खाते, नाफेड व बाजार समित्यांमार्फत शेतकर्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी गाव पातळीवर प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत गुंतवणुकीने ई-नामचा इले क्ट्रॉनिक मंच तयार केला गेला आहे. हा मंच राज्यात असलेल्या कोणत्याही बाजार पेठेत ‘प्लग-ईन’ करू देतो. ई-नामने विकसित केलेले विशेष सॉफ्टवेअर प्रत्येक बाजारपेठेत उपलब्ध आहे. जे राष्ट्रीय नेटवर्कला मोफत पण प्रत्येक राज्याच्या बाजारपेठेच्या अधिनियमांतर्गत नियमानुसार आवश्यक अनुकूलतेसह जोडले जाण्याचे मान्य करते.- प्रशांत तळोले, ई-नाम योजना प्रमुख, कृउबास, मलकापूर