- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी आणि कोरोना संबंधीत माहिती संकलित करण्यासाठी खामगाव नगर पालिकेच्यावतीने ‘दक्षता पथके’ गठीत करण्यात आली आहे. या पथकांमुळे कोरोना उपाययोजनेसाठी मदत होत आहे. आरोग्य, पालिका आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या या पथकांची कामगिरी जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरत आहे.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नांदुरा पालिकेत भिलवाडा पॅटर्नची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचवेळी खामगाव नगर पालिकेने स्वत:चा ‘दक्षता पथकाचा पॅटर्न’ अंमलात आणला आहे. गत दीड महिन्यांपासून शहरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तसेच उपाययोजनेसाठी या पॅटर्नची मदत होत आहे. पोलिस प्रशासनावरील ताण कमी होण्यासही हा पॅटर्न कामी येत असल्याने जिल्ह्यातील पालिकामध्ये ‘खामगाव पॅटर्न’ची चर्चा आहे.कोरोना संचारबंदी काळात शहरातील प्रत्येक प्रभागावर लक्ष पुरविण्यासाठी नगर पालिका कर्मचारी, आशा सेविका आणि पोलिस कर्मचाºयाचा समावेश असलेले दक्षता पथक तयार केले आहे. पथकांमुळे शहरातील प्रत्येक हालचालीची माहिती मिळते.- धनंजय बोरीकरमुख्याधिकारी, खामगाव.
संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी; खामगाव पॅटर्न ठरतोय प्रभावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 11:47 AM