लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाºया कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खामगाव शहरात कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी येथे दिले. गृहमंत्री ना. देशमुख राज्याच्या दौºयावर असताना त्यांनी मंगळवारी दुपारी खामगाव येथे भेट दिली. येथील हॉटेल देवेंद्रवर त्यांनी महसूल आणि पोलिस विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतल रसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्यासह महसूल आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्याकडून त्यांनी खामगाव शहरात कोरोना संचारबंदी काळात करण्यात आलेल्या वाहनांवरील कारवाईचा आढावा घेतला. संचारबंदी काळात किती वाहने जप्त केली? याबाबत माहिती घेतली. गृहमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांनी १६०० दुचाकी वाहनकांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. तर १४०० दुचाकी वाहने जप्त केल्याचे उत्तर देताच, शहरात करण्यात आलेल्या धडाकेबाज कारबाईबाबत समाधान व्यक्त केले.
विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांशी चर्चा!गृहराज्यमंत्री अनिल देशमुख खामगाव दौºयावर असताना आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष देवेंद्र देशमुख, दादासाहेब कविश्वर, अंजुमन मुफिदूल इस्लामचे अध्यक्ष डॉ.वकारउल हक, दिलीप पाटील, प्रभाकर झाडोकार, अॅड. विरेंद्र झाडोकार, जगन्नाथ शेगोकार, देशमुख, सचिन पाठक आदींनी ना. देशमुख यांच्याशी चर्चा केली.