पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील तीन, चिखली तालुक्यातील चार आणि सिंदखेड राजा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. दरम्यान, दहा तालुक्यांतील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही. दुसरीकडे शुक्रवारी ५० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ९७ हजार २४० संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांपैकी ८६ हजार ३१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
--१,६३५ अहवालांची प्रतीक्षा--
तपासणीसाठी घेण्यात आलेल्या संदिग्धांपैकी अद्यापही १ हजार ६२५ जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८७ हजार ५९ झाली आहे. त्यापैकी ७६ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.