एकापेक्षा एक सरस मोबाईल आल्याने मोबाईलची साठवण क्षमताही अनेक पटीने वाढली आहे. सुरुवातीच्या काळात मोजक्याच लाेकांकडे मोबाईल असायचे. त्यामुळे न॑बर सहज पाठ होत असत. आता मात्र एका मोबाईलमध्ये अनेकांचे नंबर जतन करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वत:च्या मोबाईल नंबरशिवाय इतरांचा नंबर लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्नही केळा जात नाही. विशेष म्हणजे अनेकांना पत्नीचाही नंबर पाठ नसल्याचे समोर आले आहे. बुलडाणा शहरातील चिंचाेली चाैक, स्टेट बँक चाैकात शुक्रवारी दहाजणांना त्यांच्या पत्नीचा मोबाईल नंबर लक्षात आहे का, याची विचारणा केली असता दहा पैकी आठजणांनी पत्नीचा मोबाईल नंबरच लक्षात नसल्याचे सांगितले. मोबाईल फोनमध्ये एकदा नंबर सेव्ह केल्यानंतर पुन्हा नंबर पाहण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले़
अ व्यक्तीला पत्नीच्या
मोबाईल क्रमांकाचे सुरुवातीचे चार
अंक सांगता आले, तर नंतरचे अंक सांगता आले नाहीत.
ब व्यक्तीला स्वतःचा नंबर
सांगता आला. मात्र, पत्नीचा मोबाईल
नंबर पाठ नसल्याचे त्याने सांगितले.
क - या व्यक्तीने पत्नीकडे
असलेल्या माेबाईल नंबरचे सुरुवातीचे
दोन व शेवटचे चार अंक सांगितले.
ड - या व्यक्तीने घरात एकच
मोबा्ईल असल्याचे सांगितले. त्यामुळे हा नंबर सर्वांनाच पाठ असल्याचा
दावाही त्याने केला.
सर्व सारखेच
आता सर्वांकडेच स्मार्ट फोन असल्याने जास्तीत जास्त वेळ ऑनलार्ईन राहत आहेत. फोनमध्ये नंबर सेव्ह केला जात असल्याने नंबर लक्षात ठेवण्याकडे फारसे कुणी लक्षच देत नाही.
तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच आपला मोबाईल नंबर सोडून इतरांचा नंबर लक्षात राहत नाही. शुक्रवारी एकास स्वतःचा सोडून, तर कोणता नंबर पाठ आहे, असे विचारले असता त्याच्या बॉसचा नंबर लक्षात असल्याचे त्याने सांगितले. आणखी एकाला विचारले असता त्याने पत्नीचा माेबाईल क्रमांक पाठ असल्याचे सांगितले.
महिलांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना
माझ्याकडे स्मार्ट फाेन आहे. मला माझा माेबाईल क्रमांक पाठ आहे. मात्र, मिस्टरांचा माेबाईल क्रमांक पाठ नाही. माेबाईलमध्ये नंबर सेव्ह राहत असल्याने पाठ करण्याची गरजच पडत नाही. त्यामुळे, पाठ केला नाही.
एक गृहिणी
दाेन वर्षांपासून माेबाईल वापरते. माझ्या मुलांकडे व मिस्टरांकडे माेबाईल आहेत. त्यांचे क्रमांक मात्र पाठ नाहीत. कधी गरज पडत नाही. नाव सर्च केल्यानंतर काॅल करता येताे. त्यामुळे, पाठ करण्याची कधी गरजच पडली नाही.
एक गृहिणी
मुलांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठशाळेत आई, बाबांचाही माेबाईल क्रमांक दिला आहे. तसेच शाळेच्या डायरीवरही माेबाईल क्रमांक लिहून ठेवला हाेता. त्यामुळे, दाेघांचाही माेबाईल क्रमांक पाठ करून ठेवला आहे. शाळा सुरू नसल्या तरी क्रमांक मात्र पाठ आहे.
यश जाधव, विद्यार्थी
माझ्याकडे माेबाईल नाही. बाबांना नेहमी फाेन लावावा लागत असल्याने पाठ आहे. तसेच आईचा माेबाईल क्रमांकही पाठ आहे. शाळेत घ्यायला येत असल्याने माेबाईल क्रमांक पाठ झाले हाेते. ते अजूनही पाठ आहेत.
सागर वानखडे, विद्यार्थी
मुलांची स्मरणशक्ती चांगली असते
व्यसनाधीनता, मानसिक आजार, फिटचा आजार, आदींमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच ६० वर्षांनंतर काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. त्यामुळे लहान मुलांना माेबाईल क्रमांक आठवताे.
डॉ. विश्वास खर्चे, मानसोपचारतज्ज्ञ