लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील बहुचर्चित शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी माजी आमदार दिलीपकुमार सानंदांसह आठही जणांना ३ ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे.स्थानिक शिवाजी वेस भागातील श्री शिवाजी व्यायाम मंदिर इमारत बांधकामात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी २३ मे रोजी रात्री न.प.च्यावतीने देण्यात आलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी विविध कलमान्वये तब्बल २0 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणातील आरोपींपैकी गोकुलचंद सानंदा, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, सरस्वती खासणे आदींनी प्रथम येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन गुन्हे दाखल होण्यापूर्वीच अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला होता. २५ मे रोजी डिगांबर खासणे, महावीर थानवी, कांतीलाल भट्टड यांनी न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्यांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यात आला होता. त्यानंतर न.प.चे तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनीही न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला हो ता. यासर्व अटकपूर्व जामीन अर्जावर एकत्रितरीत्या सुनावणी ठेवली होती. जून, जुलै व ऑगस्टमध्ये विविध तारखांना झालेल्या सुनावणीअंती ३ ऑगस्ट रोजी या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायाधीश सूर्यवंशी यांनी निर्णय देऊन या आठही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
दिलीपकुमार सानंदांसह आठ जणांना अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:09 AM
खामगाव : येथील बहुचर्चित शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी माजी आमदार दिलीपकुमार सानंदांसह आठही जणांना ३ ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे.
ठळक मुद्देबहुचर्चित शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहार प्रकरणअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निकाल