नांदुरा (जि. बुलडाणा), दि. १३- आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चार उमेदवारांसह आठ जणांविरुद्ध नांदुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा नांदुरा तहसीलदार वैशाली देवकर यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, रामभाऊ वासुदेव सरोदे रा.महाळुंगी आणि कैलास नारायण सातव रा. वडनेर भोलजी हे त्यांच्या वाहनांवर विना परवानगीने शिवसेना उमेदवाराचा प्रचार महाळुंगी ते तरवाडी रोडवर करताना मिळून आले. यावरून भरारी पथक प्रमुख अभिजीत देशमुख यांच्या तक्रारीवरून या दोघांविरुद्ध नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तर वडनेर भोलजी येथे गुजरी चौकात विद्युत पोलवर संतोष बळीराम डिघे रा. वडनेर भोलजी व सुनंदा वसंतराव भोजने रा.जिगाव या उमेदवारांचे विना परवानगी फलक आढळून आले. त्यावरून चंदु ढवक यांच्या तक्रारीवरून डिघे व सौ.भोजनेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्या प्रकरणात खैरा येथे ज्योती अनिल शिंगेटे व दिवाने पुष्पलता लहुजी या उमेदवारांचे प्रचाराचे बॅनर विद्युत पोलवर विनापरवानगी लावलेले आढळून आले. त्यामुळे बोराखेडी पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभानखा रा.वसाडी हा ऑटोद्वारे, तर नंदकिशोर गजानन आजोळे रा. वसाडी हा वाहनाद्वारे विनापरवाना प्रचार करताना आढळला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार उमेदवारांसह आठ जणांवर गुन्हा दखल
By admin | Published: February 14, 2017 12:29 AM