बुलडाणा, दि. ३१: जिल्ह्यातील भक्तांच्या भावनेशी जोडली गेलेली तीर्थक्षेत्रे सोयी-सुविधांनी युक्त असावी, यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी ती र्थक्षेत्रांना ह्यबह्ण वर्ग दर्जा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याअं तर्गत नव्याने जिल्ह्यातील आठ तीर्थक्षेत्रांना ह्यबह्ण वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंंंतची कामे याठिकाणी प्रशासकीय स्तरावरून केली जाऊ शकतात. तीर्थक्षेत्री येणार्या भाविकांसाठी निवास व्यवस्था व अन्य सुविधा देऊन विकासात्मक बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया खा. प्रतापराव जाधव यांनी दिली. खा. प्रतापराव जाधव, शिवसेनेचे मेहकरचे आ.डॉ. संजय रायमुलकर, सिंदखेड राजाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ग्रामविकास मंत्री ना. केसरकर, ना.भुसे यांच्याकडे राज्यस्तरीय तीर्थक्षेत्र विकास समितीकडे शासन स्तरावर यासाठी प्रयत्न केले होते. प्रधान सचिव असिम गुप्ता, न.म.शिंदे यांच्यासह अन्य सदस्य असलेल्या तीर्थक्षेत्र विकास समितीने याबाबत निर्णय घेतला. यामध्ये ११ ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये उपरोक्त समितीची बैठक झाली. यात सिद्धेश्वर बुधाजीबाबा संस्थान-उकळी ता.मेहकर, मुक्तधाम आश्रम-सावरगाव माळ ता. सिंदखेड राजा, माळाशी देवी संस्थान- देऊळगावमही ता. दे. राजा, गुलाबबाबा संस्थान- काटेल ता.संग्रामपूर, बगदालब्ध संस्थान- उटी ता. मेहकर, महानुभाव आश्रम -मढ ता. बुलडाणा, विठ्ठल रुक्मिणी संस्थान - वैष्णवगड ता. सिंदखेड राजा, आनंदस्वामी संस्थान - शिवणी आरमाळ ता.दे.राजा यांना ह्यबह्ण वर्ग दर्जा मिळाला आहे. या संस्थान परिसरामध्ये रस्ते, भक्त निवास व अन्य सुविधांच्या संदर्भात विकास कामे आगामी काळात प्रशासकीय पातळीवरून करण्यात येतील.
बुलडाणा जिल्ह्यातील आठ तीर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा!
By admin | Published: September 01, 2016 2:27 AM