मेहकर : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये दोन ग्रामपंचायती अवरोध झाल्यामुळे ३९ ग्रामपंचायती करिता निवडणूक प्रक्रिया पार पडली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड ९ फेब्रुवारी राेजी करण्यात आली. डोणगावच्या ग्रामपंचायत सदस्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ निवड प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.
तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे सरपंचपदी माधुरी विलास पागोरे, उपसरपंचपदी दत्तात्रय शंकर रहाटे, देऊळगाव साकर्शा येथे सरपंचपदी संदीप अर्जुन अल्हाट, उपसरपंचपदी अमृता गणेश गायकवाड, देऊळगाव माळी येथे सरपंचपदी किशोर विश्वनाथ गाभणे, उपसरपंचपदी रंगनाथ हरिभाऊ चाळगे, हिवरा खुर्द येथे सरपंचपदी संगीता रमेश खरात, उपसरपंचपदी अशोक पांडुरंग शिंदे, जवळा येथे सरपंचपदी मोरे मनिषा मदन, उपसरपंचपदी खरात माधव संतोष, कासारखेड येथे सरपंचपदी संतोष बबनराव मवाळ, उपसरपंचपदी मोहन आनंदा राठोड, कनका बु. येथे सरपंचपदी बोरकर शीतल अनिल, उपसरपंचपदी डाखोरे भागवत धोंडू, लावणा येथे सरपंचपदी भारत बाबूराव बोबडे, उपसरपंचपदी सुशीला भारत बोबडे, लोणी गवळी येथे सरपंचपदी दीपक आत्माराम शिंदे, उपसरपंचपदी लाभाडे रूपाली राजू, मोहना बु. येथे सरपंचपदी अंजली सुनील राठोड, उपसरपंचपदी सुरेश जानकीराम आडे, शहापूर येथे सरपंचपदी स्वाती गजानन काळे, उपसरपंचपदी वंदना गजानन वाघमारे, दादुलगव्हाण येथे सरपंचपदी अरविंद दामोदर दळवी, उपसरपंचपदी जया शरद शेजुळ, फैजलापूर येथे सरपंचपदी हेमलता मदन गाडेकर, उपसरपंचपदी वर्षा सतीश पाडमुख यांची निवड करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या निकालाकडे डाेणगाववासीयांचे लक्ष
डोणगाव येथील सरपंच, उपसरपंच पद हे रिक्त ठेवण्यात आले आहे. नामनिर्देशनपत्र भरताना दुसऱ्या प्रवर्गात अर्ज भरला गेल्यामुळे सदर उमेदवार हे न्यायालयात गेल्यामुळे तूर्तास निकाल येईपर्यंत हे सरपंच, उपसरपंचपद रिक्त ठेवण्यात आले आहे.
विवेकानंद येथे सरपंचपदासाठी चुरस
विवेकानंद नगर येथील ग्रामपंचायतकरिता शिवसेनेकडून पॅनल प्रमुख विठ्ठल भाकडे, मनोहर गिर्ह, अशोक लहाने यांनी पॅनल लढवून अकरापैकी सात जागांवर विजय मिळविला तर भाजपाचे संजय वडतकर यांना चार जागांवर समाधान मानावे लागले. गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पॅनलमधील सरपंच होतो की संजय वडतकर वेगळी खेळी खेळून करून सरपंच पदावर विराजमान होतील का? याकडे विवेकानंद नगर येथील जनतेचे लक्ष लागून आहे.