शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

लोणार नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढतीचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 3:12 PM

लोणार : नगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून, पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : नगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून, पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी जोरदार प्रचाराच्या तोफा १५ मार्च पासून सुरु झाल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या पूनम पाटोळे, शिवसेनेच्या सुनिता राजगुरू, रासप च्या सुवर्णा मोरे, भारिप च्या मनिषा वाघमारे व अपक्ष अयोध्या पसरटे यांच्यामध्ये लोणार नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी लढत होत आहे. आठ प्रभागातील १७ जागांसाठी ५८ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीसाठी १८ हजार ७३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या मध्ये महिला मतदार ९ हजार ९० तर पुरुष मतदार ९ हजार ६४७ आहेत. दहा इमरतीमधील २६ बुधवर मतदान घेण्यात येणार आहे. १४ मार्च रोजी चिन्ह वाटप झाल्याने १५ मार्च पासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. तर २२ मार्च रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने उमेदवारांनी रात्रीचाहि दिवस करीत प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. २४ मार्च रोजी मतदान होऊन २५ मार्च रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होईल.काँग्रेस व राष्ट्रवादी युती झाल्याने राष्ट्रवादी ला दोन जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ऐनवेळेवर अपक्ष उमेदवाराला पूरस्कृत करण्यात आले आहे. पालिका निवडणुकीत रंगत वाढली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणारElectionनिवडणूक