मोताळा : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक २५ मे रोजी होत आहे. सध्या कार्यरत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे.मोताळा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या अडीच वर्षाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाले होते. त्यामध्ये सव्वा वर्षाचा कार्यकाळ अनुक्रमे माधुरी पुरुषोत्तम देशमुख व सुवर्णा अंनंतराव देशमुख यांनी सांभाळला होता. आता पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे. त्यानुषंगाने येत्या २५ मे रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यात नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज २१ मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत दाखल करता येणार असून त्याच दिवशी उमेदवारी अर्जाची छानणी करण्यात येईल. २३ मे रोजी बुधवारी पात्र उमेदवरांची यादी प्रसिद्ध होईल तर २४ मे हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. २५ मे रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रत्यक्षात पारपडले. सकाळी दहा ते दुपारी १२ वाजेदरम्यान प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया पारपडले.उपाध्यक्ष पदासाठी २५ मे रोजीच सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. नगराध्यक्षांच्या निवडणुकीनंतर उपाध्यक्षपदाच्या अर्जाची छाननी करण्यात येऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनीटांचा अवधी दिल्या जाईल. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी वाचून लगोलग उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येईल, असे सुत्रांनी स्पष्ट केले. मलकापूरचे उपविभागीय अधिकारी यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. त्यांना मुख्याधिकारी गावंडे हे सहकार्य करतील. दरम्यान, या निवडणुकीमुळे मोताळा नगर पंचायतीमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मोताळा नगराध्यक्षपदाची निवडणूक २५ मे रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:21 IST
मोताळा : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक २५ मे रोजी होत आहे. सध्या कार्यरत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे.
मोताळा नगराध्यक्षपदाची निवडणूक २५ मे रोजी
ठळक मुद्देनगराध्यक्ष पदासाठी पहिल्या अडीच वर्षाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाले होते. सव्वा वर्षाचा कार्यकाळ अनुक्रमे माधुरी पुरुषोत्तम देशमुख व सुवर्णा अंनंतराव देशमुख यांनी सांभाळला होता. आता पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे.