मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील १0 ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेस १७ मार्चपासून सुरुवात झाली असून, मतदार यादी व निवडणूक निधीअभावी २७ ग्रामसेवा सहकारी संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती तालुका सहकारी निवडणूक अधिकारी नानासाहेब कदम यांनी एका आदेशाद्वारे केली आहे.तालुक्यात १२२ संस्था कार्यरत असून, यामध्ये ग्रामसेवा सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार संस्थांसह इतर संस्थांचा समावेश आहे. ६६ ग्रामसेवा सहकारी संस्था असून, यापैकी सारोळा मारोती, आव्हा, बोराखेडी, सहस्त्रमुळी, काळेगाव-फर्दापूर, मोताळा, शिरवा, शेलगाव बाजार, तरोडा व पोफळी या १0 ग्रामसेवा सहकारी संस्थांनी तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवडणूक निधी भरल्याने त्या सर्व संस्थांची निवडणूक प्रक्रिया १७ मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंंत ज्या काही संस्था अविरोध होतील त्यांची निवडणूक २९ एप्रिल, १७ एप्रिल, २३ एप्रिल व ८ मे २0१६ रोजी या ठरलेल्या तारखेला घेण्यात येतील.९७ व्या घटना दुरुस्तीमध्ये संस्थेचे थकीत सभासदांना निवडणुकीमध्ये उभे राहण्यास मनाई केली असून, मतदानसुद्धा करता येत नाही. त्यामुळे ज्यांना संस्थेची निवडणूक लढायची आहे, त्याला आपल्याकडील कर्ज भरावेच लागणार आहे; तसेच ज्या संस्थांनी निवडणूक खर्च भरला नाही त्या संस्थांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. अशा २७ ग्रामसेवा संस्था आहेत. प्रशासक नेमलेल्या ग्रामसेवा संस्था याप्रमाणे आहेत.
१0 ग्रामसेवा सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू
By admin | Published: March 29, 2016 2:11 AM