देऊळगाव राजा तालुक्यात एकूण २६ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी महिन्यात झाल्या होत्या निवडणूक निकालानंतर सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ९ फेब्रुवारी,१० फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यात प्रशासनाने जाहीर केला होता. तालुक्यातील अंढेरा-सरपंच रूपाली रामदास आंबिलकर, उपसरपंच लता गजानन सानप गिरोली खुर्द-सरपंच मुक्ता बाबासाहेब म्हस्के उपसरपंच योगिता महेंद्र खंडागळे, पळसखेड झाल्टा- सरपंच चंद्रभागा विष्णु मुंडे उपसरपंच भगवान नंदाजी खरात तुळजापूर-सरपंच निर्मला मनोहर कोल्हे उपसरपंच पुजा महेंद्र कांबळे, चिंचोली बामखेड-सरपंच शिवहरी भानुदास बुरकुल उपसरपंच अनिता मच्छिंद्र भालेराव, मंडपगाव सरपंच वैशाली सचिन कदम उपसरपंच योगिता समाधान जाधव पिंपळगाव बुद्रुक सरपंच अनंता मधुकर भालेराव उपसरपंच रामदास शेषराव मिसाळ मेहुणा राजा सरपंच मंदा विष्णु बोन्द्रे उपसरपंच साहेबराव यादवराव काकडे उंबरखेड सरपंच शिला रामदास कायंदे उपसरपंच मोगल मुन्नाबी म बेग सावखेड नागरे सरपंच मिना संजय मोरे उपसरपंच सुधाकर त्र्यंबक जायभाये नागनगाव सरपंच शितल मारोती गिते उपसरपंच रामेश्वर हिम्मत सरोदे डोढरा- सरपंच सैय्यद तहसीम अल्ताफ उपसरपंच सिताराम ग्यानु नाडे पांगरी वाडी सरपंच दिनकर भानुदास वाघ उपसरपंच कमल भगवान सोनुने आळंद सरपंच सविता सुधिर खरात उपसरपंच अनुराधा शिवाजी खार्डे पाडळी शिंदे सरपंच विद्या श्रीकृष्ण शिंदे उपसरपंच कमल अरुण जाधव याप्रमाणे विजयी झाले. निवडणूक अध्यासी अधिकारी यांनी निकाल जाहीर केल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मिरवणूक काढत गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला गुरूवारला पिंप्री आंधळे, बायगाव बुद्रुक, देऊळगाव मही, जवळखेड, मेंडगाव, निमगाव गुरु, टाकरखेड वायाळ, बोराखेडी बावरा, सावखेड भोई, आणि खल्याळ गव्हाण अशा अकरा ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
१५ ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:36 AM