जळगाव जामोद (जि. बुलडाणा): : तालुक्यात ३ जुलै रोजी दुपारी गोळेगाव येथील शेतात विज पडल्याने उत्तम गणपत इंगळे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांना उपचारार्थ खामगाव येथे नेण्यात आले आहे. उत्तम इंगळे व त्यांचे जावई वसंत पूर्णाजी वानखडे हे दोघे टाकळी पारस्कर शिवारात त्यांच्या स्वत:चे शेतात काम करत होते. पाऊस आल्याने ते निंबाच्या झाडाखाली उभे राहिले आणि याच झाडावर ४ वाजताचे दरम्यान वीज कोसळली यामध्ये उत्तम इंगळे याच डोक अक्षरक्ष जमीनीत खुपसल्या गेले ते जोरजोरात पाय फेकत होते तर वसंत वानखडे हे बेशुध्द पडले. तेव्हा आजुबाजुच्या शेतकर्यांनी त्यांना बैलगाडीत घरी आणले व तात्काळ जळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारार्थ खामगाव येथे पाठविले. याबाबत जळगाव तहसिलदार तथा उपविभागीय अधिकारी यांना कळविण्यता आले आहे, अशी माहिती सिध्दार्थ इंगळे यांनी दिली.
वीज पडून एक गंभीर
By admin | Published: July 05, 2016 1:03 AM