लोकमत न्यूज नेटवर्कचिखली (बुलडाणा) : हातणी येथील पाणी पुरवठा योजनेचा खंडित केलेला वीज पुरवठा स्वत: खांबावर चढून पूर्ववत केल्याप्रकरणी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरण कंपनीकडून चिखली तालुक्यातील १२१ पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या तक्रारी पोहोचल्यानंतर आमदार बोंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी महावि तरणचे कार्यकारी अभियंता काकाजी रामटेके यांनी २६ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत आ. बोंद्रे यांनी हातणीचे सरपंच विश्वनाथ जाधव यांच्यासोबत वीज पुरवठा जोडून घेतल्याचे नमूद केले आहे. सदर कृत्य विद्युत कायदा २00३ च्या कलम १३८ नुसार विद्युत यंत्रणेला अनधिकृ तपणे छेडछाड करणारे गैरकृत्य असून, त्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून विद्युत कायदा २00३ कलम १३८, कलम १0६, ३४ अन्वये आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदार झाले आक्रमकमहावितरण कंपनीकडून कुठलीच कारवाई न झाल्याने २५ स प्टेंबर रोजी स्वत: आ. बोंद्रे विद्युत खांबावर चढले आणि त्यांनी हातणी येथील वीज पुरवठा पूर्ववत केला होता.