शेगाव : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनासाठी युवक कॉंग्रेसच्यावतीने शुक्रवार, १९ मे रोजी शेगावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी २५ कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली.तूर खरेदीबाबत शासन उदासीन असून, अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तुरीचे मोजमाप व बारदाण्याचा अभाव, मोजणीसाठी काट्याचा अभाव, खरेदी झालेल्या तुरीचे पैसे देण्यास होणारी कुचराई यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पूर्वी २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूर खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले. आता ३१ मेपर्यंतची मुदतवाढ देऊन शासनाने चालढकल सुरू केली आहे. २२ एप्रिलपर्यंत नोंद असलेल्या तुरीची अद्याप खरेदी झालेली नाही. १० एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे देण्यात आले नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसने तूर प्रश्नी छेडलेले आंदोलन चिघळतच चालले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवारी शेगाव शहरात तालुका आणि शहर कॉंग्रेसकडून ‘रास्ता रोको’ करण्यात आले. शेगावात पक्षनेते रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक येथे पार पडलेल्या ‘रास्ता रोको’ कार्यक्रमात तालुका अध्यक्ष अशोक हिंगणे, अमित जाधव, नईम सेठ, दीपक सालामपुरीया, फिरोज खान, पं.स.सदस्य इनायतउल्ला खान, रहीम खान, संतोष माने, आबिद शाह, पवन पचेरवाल, सयेद नासीर सैलानी, रशिद, डॉ. सखाराम वानखडे, काका सोलंकर शेजोळे, शिवाजी थोरातसह २५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. घाटाखाली ‘रास्ता रोको’ ला प्रतिसादखामगाव : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी संपूर्ण जिल्हाभर रास्ता रोको २२२आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला घाटाखालील शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा या तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. कांद्याचे भाव पडल्याने संग्रामपूर येथे कांदा रस्त्यावर फेकत उग्र आंदोलन केले.मलकापुरातही रास्ता रोको आंदोलनमलकापूर : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व तूर खरेदी झालीच पाहिजे, या मागणीसाठी जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे तथा कॉंग्रेस पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. त्या समर्थनार्थ मलकापुरात कॉंग्रेसच्यावतीने शुक्रवारी दुपारी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील आयटीआय कॉलेजसमोरील ऊंबर नाल्यावरील पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात पक्षनेते डॉ.अरविंद कोलते, नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, शहर अध्यक्ष राजू पाटील, प्रा.डॉ.अनिल खर्चे, हाजी रशीदखा जमादार, नगरसेवक जाकीर मेमन, अनिल गांधी, रोहन देशमुख, अनिल बगाडे, अनिल जैसवाल, मनोहर पाटील, फिरोज खान, बंडू चौधरी, विनय काळे , गजानन ठोसर, कलीम पटेल आनंद पुरोहित, आनंद नाईक, राजू उखर्डे, सुनील बगाडे, किशोर गनबास, आदी पदाधिकारी तथा कार्यकर्तेे प्रामुख्याने सहभागी झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक व सुटका नांदुरा : शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे तसेच शेतकऱ्यांच्या तूर खरेदीस होणारा विलंब, तुरीचे चुकारे मिळण्यास लागणारा वेळ व संपूर्ण कर्जमाफी यासाठी काँग्रेसच्यावतीने आंदोलने, संघर्ष यात्रा, उपोषणे करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नांदुरा येथेही शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने रस्ता जाम आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी तात्पुरती अटक व नंतर सुटका केली. काँग्रेसचे बलदेवराव चोपडे, विजयसिंग राजपूत, संतोष पाटील, नीलेश पाऊलझगडे, भगवान धांडे, अॅड. मोहतेशम रजा, गौरव पाटील, विनल मिरगे, आसीफखॉ, अजिंक्य चोपडे, बंटी पाटील व मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी सदर आंदोलनात सहभागी झाले होते.