बुलडाणा : समाजात वावरताना मनुष्यांनी भक्ती, तप, त्याग, साधना, सम र्पण व संयम आदी गुणांचा अंगीकार केला पाहिजे, असे मौलिक मार्गदर्शन मुनिश्री १0८ विषेशसागर महाराज यांनी काढले. ४ एप्रिल रोजी मुनिश्रीचे बुलडाणा शहरात आगमन झाले. यावेळी जैन मंदिरात आयोजित प्रवचन कार्यक्रमातून ते बोलत होते.मुनीश्री म्हणाले की, मनुष्य जन्माने परमात्मा बनत नाही, तर तो प्रबळ पुरुषार्थामुळे परमात्मा बनतो, जर दृष्टी सम्यक असती तर पापीसुद्धा सज्जन बनु शकतो. त्यामुळे जीवन जगताना नेहमीच ईश्वर भक्तीची कास धरून मार्गक्रमण करा, असे मुनीश्री विशेष सागर यांनी यावेळी सांगितले. यामुळे मोठय़ा संख्येत शहरातील जैन बांधव उपस्थित होते. जैन धर्मीयांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त ५ ते १९ एप्रिल दरम्यान रोज सकाळी ८ आणि दुपारी ३ वाजता स्थानिक दिगंबर जैन मंदिर येथे मुनीश्रीच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांनी केले आहे.
संयमाचा अंगीकार करा - मुनीविशेष
By admin | Published: April 06, 2016 12:24 AM