शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

आंदोलनातून वित्त व जीवितहानी नको - पुरुषोत्तम खेडेकर यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 14:02 IST

आंदोलनांमधून वित्त हानी आणि जिवित हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.

ठळक मुद्दे पुरूषोत्तम खेडेकर यांनी सकल मराठा समाजबांधवांना प्रसिध्दी माध्यमांसह सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या व्हिडीओव्दारे दिल्या आहेत. खोट्या बातम्या पसरवणाºयांना चाप लावण्याची गरज पुरूषोत्तम खेडेकर यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली (बुलडाणा) : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे झालेली घटना समाजासाठी निश्चितच दुर्दैवी आहे. यापुढे आपल्या मागण्यांसाठी करण्यात येणाºया आंदोलनांमधून वित्तहानी आणि जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी सकल मराठा समाजबांधवांना प्रसिद्धी माध्यमांसह सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आंदोलनाची कारणमिमांसा केली आहे.खेडकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्टÑ बंद पुकारण्यात आला होता. यावर सत्ताधारी पक्षासह इतर पक्ष तसेच अन्य क्षेत्रातातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातून अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळणदेखील मिळाले असल्याने समाजबांधवांनी शांततामय मार्गाचा अवलंब करावा बहुतांशी मराठा समाज हा कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे; मात्र वाढत चाललेला उत्पादन खर्च आणि घटत चाललेले उत्पादन याचा आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेली शेती तोट्यात जात असताना किमान आरक्षण मिळावे आणि त्यातून शिक्षण व नोकºयांमध्ये संधी मिळावी यासाठी आरक्षणाची ही मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी ही आंदोलने होत आहेत. मराठा समाजाच्या आंदोलक कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी पुढे असे म्हटले की बंद अथवा मोर्चादरम्यान सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही, जनता वेठीस धरली जाणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच पंढरपूरीतूर परत निघणारे वारकरी वा सामान्य भक्त कुठेही अडकणार नाहीत, याची काळजी घ्यावी, कोणतेही हिंसक प्रकार आंदोलनादरम्यान घडता कामा नये, अनेक समाजकंटक आपल्या भलेपणाचा व भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेतात.असे ही खेडेकर यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला बदनाम करणारे टोळके वाढत आहेत. याशिवाय मराठा विरुद्ध मराठेतर वाद वाढवणारेच पुढे येत असल्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मराठा समाज लढायात जिंकतो; पण तहात हरतो, असे सतत बोलून समाजाचा अपमान करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी मराठा समाज कुण्यातरी राजकीय पक्षांचे हस्तक असल्याचे बोलले जाते. हा समाजाचा सरसकट अपमान व उपमर्द आहे. आम्ही सर्व एक नाहीत. आता तरी आम्ही सर्व एकमेकास मनापासून समजून घेणे व एकत्रित बसून ‘कॉमन पॉलिसी’ ठरवून काम करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. दोन वर्षे सकल मराठा समाज मूक क्र ांती मोर्चा सुरू होऊन झाले आहेत. आम्ही नेतृत्वहीन मोर्चाची घोषणा केली होती. शासनाच्यासाठी ही बाब जास्तीत जास्त उपयोगी ठरली आहे. समाजाबाबत खोट्या बातम्या पसरवणाºयांना चाप लावण्याची गरज पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

परिपूर्ण अभ्यासक मंडळाची गरजएक परिपूर्ण अभ्यासक मंडळ तयार करून युवकांना एकत्रित करून नेता व पदाधिकारी जाहीर केले पाहिजेत. नेटवर्क निर्माण करणे गरजेचे आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजातील अधिकारी, कर्मचारी, युवक, विचारवंत, अभ्यासक, वैज्ञानिक, संशोधक, आचार्य, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कलाकार, नाटककार, पत्रकार, व्यावसायिक, व्यापारी, वर्तमानपत्रांचे मालक, शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, हमाल, श्रमकरी अशा अनेक क्षेत्रातील नामवंत समाजशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ वा तत्सम समाज सुधारक यांना भेटणे व चर्चा करून ठरविणे आवश्यक असल्याचे खेडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :purushottam khedekarपुरुषोत्तम खेडेकरChikhliचिखली