दि चिखली अर्बन बँकेच्या चिखली शाखेच्या वतीने महिला बचत गटांना ९२ लाख १० हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला, याचे वितरण बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या हस्ते पार पडले. यानुषंगाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दि.चिखली अर्बन बँक महिला भगिनींना अर्थसाहाय्य करण्यासाठी तत्परतेने पुढे आली आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेऊन सावकारी पाशातून मुक्त व्हावे व आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन गुप्त यांनी केले. दि चिखली अर्बन बँक बचत गटातील सदस्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने बँकेमध्ये आपले खाते काढावे, बँक आपल्या खातेदारांना मोफत अपघात विम्याचे संरक्षण पुरवित आहे. ही बाब अनेक कुटुंबीयांसाठी मोठा आधार देणारी ठरली असल्याने वास्तवाची गरज व या योजनेच महत्त्व जमजून घेत खाते उघडण्याची विनंती यानिमित्ताने बँकेच्यावतीने करण्यात आली. कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, संचालक मनोहरराव खडके, स्थानिक शाखा सल्लागार अर्चना खबुतरे, अलका पुरणकर, बँकेचे सरव्यवस्थापक संजय भांगिरे, शाखाधिकारी जोशी, बचतगट प्रतिनिधी देवीदास सुरुशे, ज्योती परिहार, पवन तेलंग्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विविध बचत गटांच्या महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. (वा. प्र.)
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर : सतीश गुप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:34 AM