लोकमत न्युज नेटवर्क खामगाव : राज्य सरकारी सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव, शेगाव, संग्रामपूर तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी, ७ जुलैरोजी सक्रीय पाठींबा दर्शवला. कर्मचाºयांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर दिसून आला. राज्यातील कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी ७, ८ व ९ आॅगस्ट रोजी संपाची हाक दिली आहे. या संपामध्ये राज्य शासनाचे महसूल, कृषी, ग्रामविकास, आरोग्य, बांधकाम, नगर पालिका आदी विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. खामगाव नगर पालिकेतील कर्मचाºयांनी सुद्धा कामबंद आंदोलनात सहभाग दर्शवला आहे. कर्मचारी काळ््या फिती लावून आंदोलन करतांना दिसून आले. खामगाव तहसील कार्यालयातील कर्मचाºयांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. नांदुरा येथे शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी गटविकास अधिकाºयांना निवेदन देवून पंचायत समितीसमोर निदर्शने केली.
कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 2:06 PM