सिंदखेड राजा : तालुक्यात भारतीय जैन संघटनेमार्फत सुरू असलेल्या गाळ उपसा अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील पाचर् गावामधील शेतकरी मोठ्या प्रमाणात तलावातील गाळ उपसुन आपली जमीन सुपीक करीत आहेत. जैन संघटनेमानर्फत जिल्ह्यासाठी ५० कोटीच्या जेसीबी पोकलँड मशीन खरेदी करण्यात आल्या असून, त्यातील सिंदखेड राजा तालुक्यात नऊ जेसीबी व एक पोकलँड पुरविण्यात आले आहे. त्याव्दारे किनगाव राजा येथील नदी, तांदुळवाडी पांगरखेड धरन, धानोरा येथील विद्रुपा धरण, हनवतखेड, गारखेड तलावातील गाळ या जेसिबीव्दारे ट्रॅक्टरमध्ये भरुन आपल्या शेतामध्ये टाकत आहेत. त्यामुळे पडीक जमीन, खडकाळ जमीन, सुपीक होत आहे. तांदुळवाडी पांगरखेड धरनातील गाळ उपसा होत असलेल्या ठिकाणी सिंदखेड राजा तहसिलदार संतोष कनसे, ठाणेदार बळीराम गीते यांनी २८ मार्च रोजी तलावास भेट देवुन पाहणी केली. तांदुळवाडी या धरनामध्ये चार लाख ११ हजार घनमिटर गाळ आहे. त्यापैकी ४१ हजार घनमिटर गाळ उपसण्यात येणार आहे. हा गाळ उपसण्यासाठी महसुल विभागांतर्गत शेतकºयांना प्रात्साहित करुन करण्यात येत आह. या धरनावरुन सहा पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत आहेत. गाळ उपसल्यामुळे एक लाख घन मिटरने पाण्याची साठवणुक क्षमता वाढुन पररसरातील विहीरींची पाणी पातळी वाढणार आहे. गाळ नेण्यासाठी तहसिलदार संतोष कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी बोंद्र, झोरे, आर.आर. काकडे यांनी हे जैन संघटनेच्या पदाधीकाºयांसोबत काम करत आहेत. जास्तीत जास्त शेतकºयांनी या तलावातील गाळ आपल्या शेतात टाकावा, असे अवाहन तहसिलदार संतोष कनसे यांनी केले आहे.
सिंदखेड राजा तालुक्यात गाळ उपसा अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 3:59 PM
सिंदखेड राजा : तालुक्यात भारतीय जैन संघटनेमार्फत सुरू असलेल्या गाळ उपसा अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील पाचर् गावामधील शेतकरी मोठ्या प्रमाणात तलावातील गाळ उपसुन आपली जमीन सुपीक करीत आहेत.
ठळक मुद्दे जैन संघटनेमानर्फत जिल्ह्यासाठी ५० कोटीच्या जेसीबी पोकलँड मशीन खरेदी करण्यात आल्या. त्यातील सिंदखेड राजा तालुक्यात नऊ जेसीबी व एक पोकलँड पुरविण्यात आले आहे. तांदुळवाडी या धरनामध्ये चार लाख ११ हजार घनमिटर गाळ आहे.