लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील बाजाराला जागा अपुरी पडत असून आठवडी बाजार प्रमुख रस्त्यासह परिसरातील शासकीय कार्यालयाची जागा व थेट मुख्य दरवाजापपर्यत लघू व्यवसायीकांनी आपले बस्तान मांडले आहे. शहरातील अतिक्रमण काढून आता दिड वर्षांचा काळ लोटल्यानंतर आज शहरात मुख्य मार्गावर अतिक्रमाणे पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसत आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर २०१५ दरम्यान शहरात नगर पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे प्रशासनाकडून या लघू व्यवसायीकांना पर्यायी व्यवस्थाही करुन देण्यात आली. मात्र आज शहरातील अतिक्रमाची परिस्थिती जैसे थे आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आता बाजाराची जागा कमी पडू लागल्याने स्टेट बँक चौक ते मेन रोड, मलकापूर रोड, सिनेमा टॉकीज, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, जिल्हा कोषागार कार्यालया व पोस्ट आॅफिस आवारात अतिक्रमाची दुकाने पोहचली आहे. शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध व दुतर्फा अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटल्यामुळे स्थायी दुकानदारांची परवड होत आहे. आता तर शासकीय कार्यालयाच्या जागेतही व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत़ येथेच बाजारासाठी आलेले नागरिक आपली वाहने उभी करत असल्याने कार्यालय परिसराला वाहनतळाचे स्वरुप प्राप्त होते. यामुळे शासकिय कार्यालये असुरक्षीत झाली आहे.
प्रवेशद्वारापर्यत अतिक्रमणशहरातील शासकीय कार्यालयाच्या थेट प्रवेश द्वारापर्यत आज अतिक्रमण झालेले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या भिंतीला खेडून कपड्यांचे दुकाने लावली जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारे फळविके्रत्यांनी अतिक्रमील आहे. तर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चहा कॅटिंग, पानठेले लागले आहे.