खामगाव : शहरातील मुख्य रस्ताच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता बसस्थानक चौकात तब्बल १ तास वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे उपविभागीय पोलिस अधिकारी या मार्गाने जात असतांना त्यांनीही विस्कळीत झालेल्या वाहतूकीकडे दुर्लक्ष करीत पालिकेकडून मार्ग काढून कानाडोळा केला. सामान्य रुग्णालय ते जि.एस. कॉलेजपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुतर्फा अतिक्रमण केले आहे. ४० फुट असलेला रस्ता दहा फुटाचाच झाला आहे. यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून किरकोळ भांडणे नित्याचेच झाले आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाचे या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याने अतिक्रमण वाढतच चालले आहे. सोमवारी या प्रकाराने बसस्थानक ते जलंब नाका पर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे याच मार्गावर पोलिस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसिल कार्यालय, कृषी विभागाचे कार्यालय, सामान्य रुग्णालयासह अनेक खासगी दवाखाने आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ राहते. त्यात अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होते. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे शहरातील वाढत्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाल्याने रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले आहे. यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
खामगावातील मुख्य रस्ताच अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 3:26 PM
खामगाव : शहरातील मुख्य रस्ताच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
ठळक मुद्देसामान्य रुग्णालय ते जि.एस. कॉलेजपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुतर्फा अतिक्रमण केले आहे.४० फुट असलेला रस्ता दहा फुटाचाच झाला आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता बसस्थानक चौकात तब्बल १ तास वाहतूक विस्कळीत झाली होती.