जिल्ह्यातील एकूण गावे:- १,२७२
नवीन विंधन विहीर घेणार:- ६१
विहिरीतील गाळ काढणार:- ०१
पाणीटंचाई भेडसावणारी गावे-- ६८७
पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती:- २१
खासगी विहीर अधिग्रहण:- ५५९
--पाणीटंचाई कृती आराखडा तयार--
जिल्ह्याचा टंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यात ९५६ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. जवळपास ६८७ गावात मार्चनंतर पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असून विंधन विहिरी घेण्यावर जवळपास ३ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून जिल्ह्याचा टंचाई निवारण कृती आराखडा हा १६ कोटी रुपयांचा आहे.
--एका गावास टँकरद्वारे पाणीपुरवठा--
बुलडाणा तालुक्यातील ६२५ लोकसंख्या असलेल्या पिंपरखेड गावास सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच मार्चनंतर बुलडाणा जिल्ह्यातील ८२ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्याचाही नुकताच प्रशासनाने आढावा घेतला आहे.
--८ विहिरींचे झाले अधिग्रहण--
मार्चमध्येच सध्या पाणीटंचाईची तीव्रता ग्रामीण भागात वाढत असून बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड, चिखली तालुक्यातील दिवठाणा, शेगाव तालुक्यातील जानोरी, चिंचखेड, कुरखेड, नांदुरा तालुक्यातील नारखेड, हिंगणा बोटा, बोरवंड येथे खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.