शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

देऊळगावराजा मृदा व जलसंधारण विभागाचा अभियांत्रिकी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 4:49 PM

बुलडाणा : पाझर तलावात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या  देऊळगावराजा मृदा व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान किनगाव जट्टू येथे रंगेहात अटक केली. प्रल्हाद  नामदेव पायघन असे लाच स्कीकारणाऱ्या  अधिकाऱ्याचे नाव आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील ...

ठळक मुद्देप्रल्हाद  नामदेव पायघन असे लाच स्कीकारणाऱ्या  अधिकाऱ्याचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान किनगाव जट्टू येथे रंगेहात अटक केली.जमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच मागितल्याची तक्रार किनगाव जट्टू येथील तक्रारदाराने एसीबीकडे नोंदवली होती.

बुलडाणा : पाझर तलावात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या  देऊळगावराजा मृदा व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान किनगाव जट्टू येथे रंगेहात अटक केली. प्रल्हाद  नामदेव पायघन असे लाच स्कीकारणाऱ्या  अधिकाऱ्याचे नाव आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव जट्टू येथील तक्रारदाराने ५ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्यामध्ये जमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच मागितल्याचे नमूद केले होते. याबाबत ५ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. मात्र स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रल्हाद नामदेव पायघन वय ३७ यास संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्कीकारली नाही. त्यामुळे पुन्हा २८ फेब्रुवारीला सापळा रचण्यात आला. यावेळेस पायघन याने ३० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक नाशिककर, पोलिस उपअधिक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्र. बा. खंडारे, हेड कॉन्स्टेबल जवंजाळ, लेकूरवाळे, गडाख, सोळंके, लोखंडे, पवार, समीर शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeulgaon Rajaदेऊळगाव राजाSindkhed Rajaसिंदखेड राजा