फहीम देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : प्रवासामध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे आणि प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाइल इंटरनेटच्या वापरात अडथळा येऊ नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये इंटरनेटची मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात ही सेवा दिली जात असून, यात शेगाव आगारातील सर्व ५० गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध करून दिल्या गेली आहे.'यंत्र मीडिया सोल्युशन' या कंपनीद्वारे गाड्यांमध्ये वाय-फायचे यंत्र बसविण्यात येणार आहे. वाय-फाय सुविधेच्या वापरासाठी प्रवाशांना प्रथम त्यांच्या मोबाइलमधील वाय-फायचा पर्याय सुरू करावा लागेल. त्यानंतर इंटरनेट ब्राऊझर अॅप ओपन केल्यानंतर कंपनीने दिलेली यूआरएल टाकावी. त्यानंतर प्राथमिक वैयक्तिक माहिती विचारली जाईल. ती माहिती भरल्यानंतर वाय-फाय सेवेचा उपभोग घेता येईल. वाय-फाय सुरू झाल्यानंतर प्रवाशांना त्या मोबाइल अॅपद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, लहान मुलांसाठी कार्टून, टीव्ही वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिका पाहता येणार आहेत. प्रवाशांना फक्त एकदाच त्यांचा मोबाइल वाय-फाय यंत्राशी जोडावा लागणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक प्रवासात त्यांच्या मोबाइलवर ही सुविधा नियमित उपलब्ध होईल. त्यासाठी पुन्हा सुरुवातीपासून कार्यवाही करावी लागणार नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे शेगाव बसस्थानक प्रमुख मुसळे यांनी दिली.प्रवाशाला चित्रपट, गाणे किंवा टीव्हीवरील मालिका पाहावयाची असेल, तर ते पाहण्यासाठी वाय-फाय मेन्यूद्वारे एसएमएस करता येणार आहे, तसेच आवडती गाणी, चित्रपटांची मागणीही एसएमएसद्वारे करता येईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर असणारी ही सुविधा प्रवाशांच्या पसंतीस उतरल्यास लवकरच संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक एसटीमध्ये कार्यान्वित केली जाणार आहे, असे समजते. आतापर्यंत एसटीच्या गाड्यांमध्ये वाय-फाय हॉटस्पॉट बसविण्यात आले आहे. हॉटस्पॉटची कार्यपद्धती आणि त्याचा वापर याची पाहणी नोव्हेंबर अखेरपर्यंत केली जाणार आहे.मेन्यू होणार रिफ्रेशप्रवासामध्ये वाय-फाय सेवेचा लाभ घेताना चित्रपट, गाणी किंवा मालिका आवडली असेल आणि ती परत पाहण्याची इच्छा झाली, तर वाय-फाय मेन्यूद्वारे एसएमएस करता येणार आहे. तसेच एसएमएसद्वारे पुन्हा त्यांची मागणी करता येणार आहे. त्यानुसार पंधरा दिवसांमध्ये प्रवाशांनी केलेल्या मागणीच्या आधारे मेन्यू रिफ्रेश केला जाणार आहे.
बसमध्ये प्रवासी घेताहेत मनोरंजनाचा आनंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 1:49 AM
शेगाव : प्रवासामध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे आणि प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाइल इंटरनेटच्या वापरात अडथळा येऊ नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये इंटरनेटची मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देशेगाव आगारातील एस टी बसेस झाल्या वाय-फाय युक्त !