शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

हजरत खैरूल्लाह शाह बाबा यांचा संदल उत्साहात

By admin | Published: March 16, 2017 3:14 AM

भाविकांची लक्षणीय उपस्थिती; ढोलताशांच्या गजरात निघाली मिरवणूक

चिखली, दि. १५ : येथील बाबुलॉज चौक परिसरातील हजरत खैरूल्लाह शाह बाबा यांचा संदल दरवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने १५ मार्च रोजी ढोल-ताशांच्या गजरात भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली होती.सैलानी बाबांचे शिष्य हजरत खैरूल्लाह शाह बाबा यांचा स्थानिक बाबुलॉज चौक परिसरात दर्गाह आहे. सैलानीप्रमाणेच दरवर्षी होळीच्या तिसर्‍या दिवशी हजरत खैरूल्लाह शाह बाबांचा संदल व उरूस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. देशातील कानाकोपर्‍यातून सैलानी येथे येणारे सैलानी बाबांचे निस्सीम भक्त चिखली येथेही न चुकता हजरत खैरूल्लाह शाह बाबा यांच्या दर्गाहवर दर्शनासाठी हजेरी लावतात. त्यामुळे शहर सध्या भाविकांनी फुलून गेले असून दर्गाह परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. दरम्यान १५ मार्च रोजी खैरूल्लाह शाह बाबा यांच्या संदल शरीफ निमित्त माजी नगराध्यक्ष सलीम मेमन व मित्र परिवाराच्यावतीने उंटावरून चादर शरीफ ढोल, ताशे व नगार्‍यांसह वाजत-गाजत नेवून दर्गाहवर चढविण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुधीर चेके पाटील, सलीमखॉ करीमखॉ, सलीम मन्यार, हनिफ बाबा, मो.परवेज मेमन, शेख अल्ताफ, शे.सलीम मिस्तरी, रऊफ शहा, आजम बागवान, इरफा मियॉ, इरफान कुरेशी, अफजल मेमन, दिनेश जायलवाल, गोपाल मारोठे, किशन जायलवाल, समीऊल्ला खॉ, अक्रम मेमन, महेश चव्हाण, वसीम मेमन, आशीफ जमदार, सै.अजहर, मो.इकबाल, सै.जुनेद, नाजु अली, कय्युम टेलर, सै.समिर, शे.नदिम, नसीरखॉ कुरैशी, युनुस बागवान, बुढनभाई, अहेमद पहेलवान, शफी मिस्तरी, शे.शब्बीर, नंदकिशोर तातडे पाटील, मो.जावेद, समिर मेमन, सोहील मेमन, शे.इमरान, शे.इनायत, हारून मन्यार, असलम पहेलवान, अशपाक कुरैशी, मुन्ना मेमन, सै.अमिर सै.गुलाब, मुजम्मील पहेलवान, मो.हनिफ धोबी, हेमंत जायलवाल, सै.आरीफ, शे.अयाज, अनिस मौलाना, नियामत पहेलवान, सै.हनिफ यांच्यासह शेकडो भाविकांची उपस्थिती होती. दरम्यान दुपारी अडीच वाजता हजरत खैरूल्लाह शाह बाबा यांच्या भव्य संदल मिरवणुकीस प्रारंभ हावून बाबुलॉज चौक, जयस्तंभ चौक, राजा टॉवर, जुने गाव, मदन शहावली दर्गाह, सावजी गल्ली, चिंच परिसर, बागवान गल्ली व पोलिस स्टेशन मार्गे पुन्हा रात्री दहा वाजेच्या सुमारास दर्गाह येथे मिरवणुक विसर्जीत करण्यात आली.