लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मलकापूर मार्गावरील राजूर घाटात मंगळवारी सायंकाळी दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रस्त्यावरील दरड हटविण्याचे काम २८ जून रोजी युद्धस्तरावर सुरु होते. यावेळी बघणाऱ्यांची गर्दी झाली जमली असता, अचानक एक अस्वल त्या ठिकाणी आल्याने उपस्थितांची तारांबळ उडली. या परिसरात अस्वलाने अनेकदा हल्ले केल्यामुळे काहीवेळाकरिता काम थांबविण्यात आले होते. बुलडाणा शहरापासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या राजुर घाटातून मलकापूर- सोलापूर हा मार्ग जातो. २७ जूनच्या सायंकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे या मार्गावरील देवीच्या मंदीराजवळ पहाडाचा काही भाग कोसळून मलबा मुख्य मार्गावर आला. पुढे काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग व महसूल विभागाने संयुक्तरित्या आदेश काढून हा मार्ग रात्री ८ वाजतानंतर बंद केला होता. २८ जून रोजी सकाळी हा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरु करण्यात आले. ही घटना पाहण्यासाठी या मार्गावर हजारोच्या संख्याने लोकांनी गर्दी केली होती. या दरम्यान पहाडावरुन एक अस्वल खाली येतांना काही लोकांच्या दृष्टीस पडली. यामुळे उपस्थित लोकांमध्ये दहशत निर्माणा होवून एकाच तारांबळ उडली. लोकांच्या आवाजाने आकर्षित होवून सदर अस्वल पाहाडा खाली लोकांनी गर्दी नजिक आला, पुढे नजिकच्या खोल दरीत निघून गेला.