- अनिल गवई
खामगाव : निसर्गाचा ºहास टाळण्यासाठी खामगावात पर्यावरण पूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून सामाजिक जागृती करणाºया गृहिणीने गणेशमूर्तीसोबतच वृक्षरोपट्यांची भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला खामगावातील सृजनशील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
खामगाव येथील आनंद मठात पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात २१०० मातीच्या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये लालबागचा राजा, दगडूसेठ हलवाई, अष्टविनायक, रिध्दीसिध्दी, शेतकरी आदी मूर्तीचा समावेश असून, या मूर्तीसोबतच २१०० वृक्ष रोपटेही ठेवण्यात आली आहे. तीन-चार फूट उंचीची विविध जातीची वृक्ष रोपट्यांची अनोखी भेट देत, ‘एकच लक्ष, गणेशाच्या साक्षीने लावू वृक्ष’ असा संदेश यामाध्यमातून दिल्या जात आहे. या उपक्रमाला शहरातील पर्यावरणशील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नरत आहे. यावर्षी प्रदर्शनात येणाºया भाविकांना वृक्ष रोपट्यांची अनोखी भेट दिली जाणार आहे.
- रेणुका वरणगावकर, खामगाव
पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसोबत वृक्ष रोपट्यांची भेट देण्याचा उपक्रम खूप चांगला आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सवासोबत पर्यावरण रक्षणासाठी हातभार लागणार आहे.
- अॅड.विरेंद्र झाडोकार, खामगाव.