सरंबा येथील समर्थ कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव प्रात्यक्षिक अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील शेततळ्याला कृषिकन्येने भेट दिली. यावेळी कृषिदूतांनी शेततळ्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली.
शेततळ्यातील पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. अस्तरीकरणासाठी प्लास्टिक फिल्म वापरतात. त्याची जाडी तीनशे ते पाचशे जीएसएस असावी. दोन मीटर लांबीपर्यंत पिचिंग करावी. शेततळ्याला काटेरी तार किंवा लाकडांचे कुंपण करावे. यासह शेततळ्याचे मोजमाप करून लांबी व खोली किती असावी याबाबत प्रगतशील शेतकरी यांच्याकडून कृषिकन्या उज्ज्वला भानुदास चेके हिने माहिती जाणून घेतली. यासाठी प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक मोहजितसिंग राजपूत, प्रा. सचिन सोळंकी यांचे मार्गदर्शन कृषिकन्येला लाभले.
160921\1628-img-20210916-wa0053.jpg
बातमी साठी फोटो