बुलडाणा : शेतकर्यांना आपल्या शेतामध्ये उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना जास्तीतजास्त उत्पन्न मिळविता यावे, यासाठी जिल्ह्यात उत्पादक कंपनी स्थापन केल्या जात आहेत. राज्य शासनाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत तसेच नाबार्डच्या सहकार्यातून जिल्ह्यात २0 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येणार असून, यापैकी आठ कंपन्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांचे मालक झाले असून, त्यांचे जीवनमान आणि आर्थिकस्तर उंचावण्यास मोलाची मदत होणार आहे.ह्यलोकमतह्ण संवाद कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती देऊन अशा कंपन्यांची स्थापना ही शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळविण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त केला. जिल्ह्यात स्थापन होऊ घातलेल्या शेतकरी कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या स्थापनेची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित दहा कंपन्या स्थापन करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या कंपन्यांना बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक सुकेश झंवर हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मदत करीत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी कापूस, डाळ, केळी, दूध अशा विविध शेतमालावर प्रक्रिया करून त्याच्या विक्रीचेही काम करणार आहेत. शिवाय या शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार प्राप्त होणार आहे. शेतकरी कंपनीमार्फत उत्पादित माल राज्यासह परराज्यात आणि देशाबाहेरही निर्यात करण्यावर प्राधान्य मिळणार आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये शेतकरी कंपनीसाठी शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहे. या शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत, त्यासाठी या कंपन्यांना जागतिक बँकेच्या एमएएसपी प्रकल्पातून अनुदान देण्यात येत आहे. उर्वरित भागभांडवल शेतकर्यांना उभे करायचे आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेमुळे जिल्ह्यात उत्पादित होणार्या शेतीमालावर थेट प्रक्रिया करणे आणि विक्री करणे सुलभ झाले आहे.
जिल्ह्यात आठ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना
By admin | Published: March 11, 2015 1:53 AM