शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

३६ तासानंतरही धानोरा येथील महिको कंपनीतून बियाणे नमुने घेणे सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:10 AM

नांदुरा: महिको कंपनीच्या धानोरा येथील प्रक्रिया व पॅकिंग युनिटवर शुक्रवार ८ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी टाकलेल्या अचानक छाप्यानंतर येथील बीटी कपाशी बियाणे असलेले सर्व गोडावून सील करण्यात आले होते. तीन दिवस झाले तरी अजूनही कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या उपस्थितीत बियाण्यांचे नमुने तपासण्याचे काम रविवारीसुद्धा दिवसभर सुरूच होते. 

ठळक मुद्देबीटी कपाशी बियाणे असलेले सर्व गोडावून केले सील!कृषी सहसंचालकांच्या उपस्थितीत रविवारीसुद्धा सुरु होते नमुने तपासणीचे कम!

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: महिको कंपनीच्या धानोरा येथील प्रक्रिया व पॅकिंग युनिटवर शुक्रवार ८ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी टाकलेल्या अचानक छाप्यानंतर येथील बीटी कपाशी बियाणे असलेले सर्व गोडावून सील करण्यात आले होते. तीन दिवस झाले तरी अजूनही कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या उपस्थितीत बियाण्यांचे नमुने तपासण्याचे काम रविवारीसुद्धा दिवसभर सुरूच होते. चालू हंगामात राज्यातील जवळपास सर्वच शेतकर्‍यांचे बीटी कपाशीवरील बोंडअळीने मोठे नुकसान झाले असून, बोंडअळीला प्रतिकारक्षम असणार्‍या कपाशीवर आलेल्या बोंडअळ्यांमुळे शेतकर्‍यांना बियाणे कंपन्यांनी बीटी बियाणेच पुरविले की बीटी बियाण्यांच्या नावाखाली बिगर बीटी बियाणे पुरविले अशी शंका शेतकरी वर्गात उपस्थित होत होती. याच पृष्ठभूमीवर दाखल झालेल्या तक्रारीनंतर महिको कंपनीवर अतिशय गुप्तता राखत शुक्रवारी रात्री अति.पो.अ. संदीप डोईफोडे व श्याम घुगे यांच्या पथकाने धाड टाकून बीटी बियाण्यांचे सर्व गोडावून सील केले होते.शनिवारी सकाळपासून कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्या उपस्थितीत ६ बियाणे निरीक्षक कंपनीमधील सर्व बीटी बियाण्यांच्या लॉटचे नमुने तपासणीकरिता गोळा करीत आहेत. शनिवारी रात्री १२ पर्यंत नमुने गोळा केल्यानंतर पुन्हा गोडावून सील करून अधिकारी मलकापूर येथे मुक्कामाला गेले. यानंतर पोलिसांनी पहारा दिला. शनिवारी सकाळी १0 वाजेपासून पुन्हा नमुने गोळा करण्याचे कामास सुरुवात झाली असून, संध्याकाळपर्यंत केवळ एक ते दोन गोडावूनमधीलच नमुने गोळा झाले. कारवाईमुळे परिसरात शुकशुकाट ह७ोता.

पोलीस व कृषी विभागाचे संयुक्त पथक यामध्ये सहभागी असून, सहा बियाणे निरीक्षक बियाण्यांचे नमुने गोळा करीत आहेत. आणखी दोन ते तीन दिवस नमुने गोळा करण्यास वेळ लावण्याची शक्यता आहे.- सुभाष नागरेकृषी सहसंचालक, अमरावती

टॅग्स :buldhanaबुलडाणा