- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानावर शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजारांची मदत शनिवारी जाहीर करण्यात आली. एका एकरामागे ३ हजार २०० रुपये याप्रमाणे ही मदत आहे. परंतू सोयाबीनसाठी एका एकराला शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च आलेला आहे. त्यामुळे नुकसानाच्या या मदतीत शेतीला लागलेल्या बियाण्याचाही खर्च निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकºयांवर आता अस्मानीनंतर सुलतानी संकट आले आहे.पांढरे सोने कापूस हद्दपार होऊन आता सोयाबीनचा भाग म्हणून जिल्ह्याला ओळखले जाते. पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक उत्पादन हे सोयाबीनचे होते. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकºयांची मदार ही सोयाबीन पिकावरच आहे. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५३५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. परंतू जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान केले. आहे. पैनगंगा नदी पात्राच्या परिसरातील अनेक शेतकºयांच्या सोयाबीनच्या सुड्या पुरात वाहून गेल्या. काही सोयाबीनच्या सुड्यांना बुरशी आली. तर अनेकांचे शेतात उभे असलेले सोयाबीन सडले. त्यामुळे या पावसाने मोठे नुकसान सोयाबीन पिकाचे केले आहे. या भागातील शेतकºयांचे संपूर्ण अर्थार्जन सोयाबीन पिकावर अवलंबुन आहे. परंतु सोयाबीनचे नुकसान झाल्याने या शेतकºयांच्या नजरा शासनाकडून मिळणाºया मदतीकडे होत्या. परंतू नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी शासनाने शनिवारी मदत जाहीर केल्यानंतर शेतकºयांची मोठी निराशा झाली. जाहीर झालेली ही मदती शेतकºयांना आतापर्यंत लागलेला खर्च भरून काढणारी सुद्धा नाही.फळबाग शेतकºयांची निराशाबुलडाणा जिल्ह्यात ८४७.६० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आलेली आहे. पश्चिम विदर्भात फळबागेचे सर्वाधिक क्षेत्र हे बुलडाणा जिल्ह्यात आहे. शेतकºयांनी एमआरईजीएस, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबागा घेतल्या आहेत. पावसाचा मोठा फटका फळबागेलाही बसला आहे. फळबागेला एकरी ७ हजार २०० रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. फलोत्पादन शेतकºयांची ही निराशाच आहे.
या मदतीतून पिकांना लागलेला खर्चही भरून निघत नाही. सोयाबीनच्या भरवश्यावर शेतकºयांचे वर्षभर घर चालते. परंतू यंदा सोयाबीनच शेतकºयांच्या हातातून गेली आहे. या मदतीमध्ये वाढ करण्याची गरज आहे. शेतकºयांसाठी आंदोलन करण्यात येईल.- नामदेवराव जाधव,शेतकरी संघटना, बुलडाणा.
सोयाबीनला आतापर्यंत लागलेला खर्च या मदतीतून निघत नाही. जाहीर झालेली ही तुटपुंजी मदत शेतकºयांना न परवडणारी आहे. एका एकराला किमान सरसकट २५ हजार रुपये मदत देऊन शेतकºयांना दिलासा देण्यात यावा.- गजानन पवार,शेतकरी,अंत्री दे., ता.मेहकर.