अंढेरा : अंढेरा पाेलिसांची काेराेना महामारीच्या काळातही लाचखाेरी जाेमात सुरू असून, वाहतूक पाेलिसाचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे़ या व्हिडिओची ठाणेदारांनी गंभीर दखल घेत चाैकशी सुरू केली आहे़ अंढेरा पाेलीस स्टेशनचे चार ठाणेदार आणि चार पाेलीस कर्मचारी आतापर्यंत लाचखाेरी केल्याने निलंबित झालेले आहेत, हे विशेष़
चिखली देऊळगाव राजा महामार्गावरील वाकी फाट्यावर १३ जून राेजी सायंकाळी अंढेरा पोलीस स्टेशनचे पथक वाहतुकीच्या केसेस करत हाेते़ दरम्यान, एका वाहतूक पाेलिसाने काळीपिवळी चालकाकडून चक्क अडीचशे रुपयांची लाच स्वीकारली़ लाच घेतानाचा एकाने व्हिडिओ तयार करून ताे समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे़ या प्रकरणाची ठाणेदारांनी गंभीर दखल घेत चाैकशी सुरू केली आहे़ गत वर्षभरापासून काेराेनामुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले आहेत़ त्यातही पाेलिसांची लाचखाेरी सुरूच असल्याचे चित्र आहे़ पाेलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे़
४०० रुपयांची मागणी
चिखली ते देऊळगाव राजा मार्गावर धावणाऱ्या वाहनचालकांना अंढेरा पाेलिसांकडून ४०० रुपयांची मागणी करण्यात येते़ ४०० रुपये द्या अन्यथा कारवाईसाठी तयार राहा, असा इशारा हे पाेलीस देतात़ अंढेरा पाेलिसांची हप्ता वसुली या व्हिडिओमुळे सर्वांच्या समाेर आली आहे़ लाचखाेर पाेलिसांवर काय कारवाई हाेते, याकडे लक्ष लागले आहे़
वर्षभरापूर्वीही झाला हाेता व्हिडीओ व्हायरल
गेल्या वर्षाभरापूर्वी चिखली देऊळगाव राजा महामार्गावरील मेहकर फाटा येथे ट्रक चालक व वाहतूक पोलिसांचा असाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ट्रक चालकाकडून वाहतूक पोलीस हप्त्याची मागणी करत पैसे घेत असल्याचे दिसत हाेते़ हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्या पाेलीस कर्मचाऱ्यास तत्कालीन पाेलीस अधीक्षकांनी निलंबित केले हाेते़
काेट
व्हायरल हाेत असलेल्या व्हिडिओची गंभीर दखल घेण्यात आली आहे़ या प्रकरणी चाैकशी सुरू करण्यात आली असून दाेषी आढळल्यास याेग्य ती कारवाई करण्यात येणार आहे़
राजवंत आठवले, ठाणेदार,
पोलीस स्टेशन, अंढेरा