शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

हर घर तिरंगा, हर पेड तिरंगा; वन्यजीव सोयरे बुलढाण्याचे अनोखे अभियान

By ब्रह्मानंद जाधव | Published: August 13, 2023 4:48 PM

या मोहिमेत वन्यजीव सोयरेकडून चाफ्याच्या फुलाच्या कलमा लावण्यात आल्या. वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली

बुलढाणा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ऑगस्टपासून हर घर तिरंगा अभियानाला सर्वत्र सुरुवात झाली आहे. बुलढाण्यातील ‘वन्यजीव सोयरे’च्या वतीने हर घर तिरंग्यासोबतच हर पेड तिरंगा असे अनोखे अभियान राबविण्यात आले. संत सेवालाल महाराज टेकडी परिसरातील वृक्षांवर ध्वज लावून "हर पेड तिरंगा" मोहीम राबविण्यात आली.

हर घर तिरंगा अभियान १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. हर घर तिरंगा अभियान हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हे अभियान भारतातील नागरिकांना देशभक्ती आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठी मदत करेल. हे अभियान भारताला एक मजबूत आणि समृद्ध देश बनवण्यासाठी मदत करेल. हर घर तिरंगा अभियानाद्वारे सरकारची योजना आहे की, भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवावा. आजपासून घराघरावर ध्वज लावण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान ज्ञानगंगा अभयारण्यातील झाडांवर ध्वज लावण्याचा उपक्रम राबविण्याची संकल्पना वन्यजीव सोयरेचे नितीन श्रीवास्तव यांनी मांडली. या संकल्पनेला सर्वांनी प्रतिसाद देत १३ ऑगस्ट रोजी संत सेवालाल महाराज टेकडी परिसरात लावलेल्या झाडांवर ध्वज लावून "हर पेड तिरंगा" मोहीम राबविली.

या मोहिमेत वन्यजीव सोयरेकडून चाफ्याच्या फुलाच्या कलमा लावण्यात आल्या. वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी लावलेल्या प्रत्येक झाडावर झेंडा लावला आणि ध्वजासह वृक्षाला देखील सलामी देण्यात आली. या मोहिमेत वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव, आर्या श्रीवास्तव, विनायक वायाळ, विशाल ढवळे, नितीन धंदर, विशाल बाहेकर, तेजराव राठोड, वनविभागाचे कर्मचारी यांनी श्रमदान केले. या मोहिमेला लागलेल्या चाफा या फुलाच्या कलमा दुर्गादास झगरे यांनी उपलब्ध करून दिल्या.

देशभक्तीला वृक्षसंवर्धनाची जोडहर पेड तिरंगा घेण्यामागे एक भावनिक नात जोडले आहे. आज निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. निसर्गाचा समतोल ठीक करण्यासाठी वृक्षलागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. हर पेड तिरंगाच्या माध्यमातून देशभक्ती आणि वृक्षसंवर्धनाची जोड देण्यात येत असल्याचे वन्यजीव सोयरेचे नितीन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.