डोणगांव : काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने गावातील प्रत्येक दुकानदाराची काेराेना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने सहा बूथद्वारे कोरोना टेस्ट सुरू केली असून, पहिल्याच दिवशी ५२ लोकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. ५२ टेस्ट निगेटिव्ह आले आहेत.
मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या डोणगांवमध्ये येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने येथील कोरोना टेस्टिंगचा वेग मंदावला होता. डोणगांवमध्ये कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो ही बाब पाहता आरोग्य विभागाने २३ मार्चपासून कोरोना टेस्टिंग करण्यास सुरुवात केली. वायटी चौक परिसरातील कोरोना टेस्ट श्रीराम मठात घेण्यात आली. यात रॅपिड ५२ टेस्ट घेण्यात आल्या. सर्वच्या सर्व निगेटिव्ह आल्या, तर २४ मार्च रोजी त्रिगोनी चौक परिसर,२५ मार्च रोजी आरेगाव चौक परिसर, २६ मार्च रोजी माळी वेटाळ परिसर, २७ मार्च रोजी इंदिरा नगर परिसर, २९ मार्च रोजी राहेमत नगर परिसर अशा प्रकारे संपूर्ण गावातील नागरिक व सुपर स्पेडर म्हणून गणल्या जाणारे दुकानदार व त्याच्या दुकानातील मजुरांची कोरोना टेस्ट होणार आहे.
काेट
जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता दुकानदारांची कोरोना टेस्ट अनिवार्य आहे. असाच कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला तर कोरोना टेस्ट रिपोर्ट पहिल्या शिवाय दुकानदारांना दुकाने उघडता येणार नाहीत. तेव्हा प्रत्येक दुकानदाराने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी - डॉ. महेंद्र सरपाते, तालुका वैद्यकीय अधिकारी, मेहकर