- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ‘नीट’परीक्षा १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून मोठ्या उपाययोजना करण्यात आल्या. परंतू परीक्षा केंद्रासमोरच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या आत नियम, बाहेर उल्लंघन असे चित्र परीक्षा केंद्रावर दिसून आले. पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. ‘नीट’साठी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी यंदा प्रथमच तालुकास्तरावर परीक्षा केंद्र देण्यात आले होते.
असे झाले उल्लंघन...परीक्षा संपल्यानंतर एकावेळी योग्य पद्धतीने बाहेर जाण्याची परवागनी देणे आवश्यक होते. परंतू काही केंद्रावर एकाच वेळी अनेक विद्यार्थी बाहेर पडले त्यामुळे परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर गर्दी झाली होती. मुलांची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांने पीपीइ कीट घातलेली नव्हती.
१९ केंद्र, पाच हजार ४४२ विद्यार्थीनॅशनल इलिजिबिलीटी कम एंट्रेंस टेस्ट (नीट) बुलडाणा जिल्ह्यात एकूण १९ केंद्रावर घेण्यात आली. त्यासाठी ५ हजार ४४२ विद्यार्थी होते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दोन दिवसांपासून केंद्रावर नियोजन सुरू होते. जिल्ह्यातील १९ परीक्षा केंद्रावरील सर्व दारांचे हँडल, जिना रेलिंग, लिफ्ट बटणे आदींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. दोन दिवसांपासूनच ही सर्व व्यवस्था होत असताना ऐन परीक्षेच्या दिवशी मात्र वाढत्या गर्दीने गोंधळ उडाल्याचे दिसून आले.