शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

अमरावती विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षेचे कामकाज खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:03 AM

१ आॅक्टोबरपासून होऊ घातलेल्या आॅनलाइन परीक्षांचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न परीक्षा विभागाला पडलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी गत काही दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या अंतीम वर्ष/ सत्राच्या परीक्षांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. त्यामुळे १ आॅक्टोबरपासून होऊ घातलेल्या आॅनलाइन परीक्षांचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न परीक्षा विभागाला पडलेला आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष/सत्राच्या परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. आॅफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन असताना शासनाने त्याला मंजूरी दिली नाही.त्यामुळे, ते रद्द करून विद्यापीठाने आॅनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन जाहीर केले आहे. प्राध्यापकांकडून आॅनलाईनच प्रश्न मागविण्यात आले होते. विद्यापीठाकडेजवळपास दीड लाख प्रश्न प्राप्त झाले आहे. अशातच गुरूवारपासून राज्यभरात विद्यापीठांच्या शिक्षकेत कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे, विद्यापीठातील सर्वच विभागाचे काम ठप्प झाले आहे. याचा सर्वाधिक फटका परीक्षा विभागाला बसला आहे. काही दिवसांवर परीक्षा आलेली असतानाच कर्मचाºयांचा संप सूरू झाला आहे. प्रश्नांचे मॉडरेशनच झाले नसल्याने परीक्षा कशी घ्यावी,असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला पडला आहे. येत्या काही दिवसात शिक्षकेतर कर्मचाºयांच्या संपावर तोडगा न निघाल्यास विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता आहे. परीक्षेची प्रतीक्षा करणाºया विद्यार्थ्यांना शिक्षकेतर कर्मचाºयांचे संपाचा फटका बसला आहे. संप न मिटल्यास विद्यापीठाच्या आॅनलाईन परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत होवू शकते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाuniversityविद्यापीठ