बुलडाणा : सामान्य जनतेला बिनचूक डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ हा १ ऑगस्ट २0१७ पासून उपलब्ध करण्यासाठी शासनाने चावडी वाचन ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत १५ मे २0१७ पयर्ंत जनतेने आपला संगणकीकृत गाव नमुना नंबर व ७/१२ अचूक असल्याची खात्री करण्यासाठी संकेतस्थळास भेट द्यावी. काही आक्षेप असल्यास गावच्या तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे १५ मे ते १५ जून २0१७ दरम्यान संगणकीकृत ७/१२ चे चावडी वाचन करण्यात येणार आहे. तसेच १६ जून ते ३१ जुलै २0१७ दरम्यान संगणकीकृत ७/१२ मधील माहितीत प्राप्त आक्षेपांचा विचार करून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १ ऑगस्ट २0१७ पासून डिजिटल स्वाक्षरीत संगणकीकृत गाव नुमना नंबर ७/१२ खातेदारांसाठी उपलब्ध असणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपला ७/१२ संकेतस्थळावर पाहून त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास तलाठी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. तसेच चावडी वाचनाच्या वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे.
अचूक ७/१२ साठी चावडी वाचनाची विशेष मोहीम
By admin | Published: May 14, 2017 4:00 AM