: थकित विद्युत देयकांची वसुली सध्या जोरात सुरू आहे. विद्युत वसुली तात्काळ थांबविण्यात यावी, कोविडदरम्यानचे मार्च ते ऑगस्ट महिन्याचे २०० युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीच्यावतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तसेच मार्च २०२० ते २०२१ या दरम्यान थकित व इतर कोणतेही व्याज आकारणे तसेच शेतकऱ्यांना सरसकट वीजबिल माफ करण्यात यावे व वीज कंपनीचे सीएनजी एडिट करण्यात यावी. १ एप्रिलपासून वीज दरात वाढत केली गेली आहे. ती त्वरित मागे घ्यावी, अन्यथा आम आदमी पार्टीव्दारे तीव्र आंदोलन करण्यात येईल. मागण्या मान्य केल्यास नाईलाजाने आम आदमी पार्टीचे राज्याचे प्रमुख या नात्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी १९ एप्रिल रोजी सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे भानुदास पवार, वसुदेव लंबे, ज्योती पवार, मच्छिंद्र शेरकर, भीमराव शेटाणे, सुधाकर मानवतकर, रवी निकाळजे, धीरज चनखोरे, विजय मिसळ, दिनेश अवस्थी आदी उपस्थित होते.