रेती उपसा काच नदीच्या मुळावर
डोणगाव : समृद्धी महामार्गाच्या गौण खनिजाचे प्रकरण चांगलेच गाजत असताना स्थानिक नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. अवैध रेती उपसा काच नदीच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे. डोणगाव येथे काच नदी आहे. नदीच्या पात्रातून रात्री- अपरात्री रेतीची अवैध वाहतूक केली जाते.
स्वच्छता गृहांची दुरवस्था
बुलडाणा: स्वच्छता अभियानाचा बोलबाला असताना शासकीय कार्यालयात स्वच्छता गृहाची दुरवस्था दिसून येत आहे. तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील काही कार्यालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.
भाजीपालावर्गीय पिकांना फटका
देऊळगाव मही: अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात ढगाळ वातावरणाचा फटका भाजीपालावर्गीय पिकांना बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. देऊळगाव मही परिसरात भाजीपाल्याचे क्षेत्र आता वाढले आहे.
बुधवारचा बाजार बंद
डोणगाव: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन व्हावे, यासाठी डोणगाव येथे बुधवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. या आठवडी बाजारामध्ये परिसरातील अनेक ग्राहक व दुरवरून व्यावसायिक येतात.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे ध्वजपूजन
देऊळगाव राजा: शिवजयंतीनिमित्त देऊळगाव राजा येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे ध्वजपूजन व ध्वजारोहण बालाजी महाराज संस्थानचे विश्वस्त विजयसिंह राजे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. रामप्रसाद शेळके, डॉ. रामदास शिंदे यांची उपस्थिती होती.