लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एकीकडे प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून शिवशाहीसारखी आधुनिक बस बुलडाणा जिल्ह्याच्या ताफ्यात दाखल होत आहे; मात्र दुसरीकडे स्थानकांमधून सुटणार्या बसगाड्यांचे वेळापत्रक सात त्याने कोलमडत असल्याने प्रवाशांचा रोष एसटी चालक व वाहकाच्या मुळावर आला की काय., अशा शंका उपस्थित होत आहेत. या विलंबामुळे प्रवाशांचाही संयमाचा बांध सुटत असून, बुलडाण्यात वाहकास प्रवाशांकडून मारहाण तर मेहकर आगारातूनही वेळेवर बस सोडल्या जात नसल्याने संतप्त प्रवाशांनी चक्क बसच्या काचा फोडल्याचा प्रकार समोर आला.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन १९४८ पासून अविरत धावत असलेल्या एसटी बसवर आजही सर्वसामान्य प्रवाशांची मदार आहे. राज्य परिवहन महामंडळात वेगवेगळे बदल होत आहेत; परंतु वाहन चालक व वाहकांची कमतरता असल्याने अनेक बसगाड्या वेळेवर सुटत नसल्याचे प्रमाण जिल्ह्यातील सर्वच आगारामध्ये वाढलेले आहे. लांब पल्ल्याच्या बसफेर्यांपासून ग्रामीण भागात जाणार्या बसगाड्यासुद्धा वेळेवर जात नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडते. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. यात ज्या ठिकाणी खासगी वाहने पोहोचत नाहीत, अशा प्रवाशांना एसटी बसस्थानकावरच बसच्या प्रतीक्षेत तासन्तास बसावे लागते. ‘जनसामान्यांसाठी रस्ता तेथे एसटी’ यावर राज्य परिवहन महामंडळची बस सुरू आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील परिस्थिती वेगळीच झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये आजही बसफेरी पोहोचत नाही. ज्या गावांमध्ये बसफेरी सुरू आहे, त्या बसगाड्यांचेही नियोजन कोलमडत असल्याने प्रवाशांचा राज्य परिवहन महामंडळाप्रती रोष वाढत आहे. प्रवाशांचा हा रोष एसटी चालक व वाहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
गावात बस उशिरा आणली म्हणून काचा फोडल्याडोणगाव : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहापूर येथे २ डिसेंबर रोजी बस उशिरा आणण्याच्या कारणावरुन बसच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली. शहापूर बसस्थानकावर २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता मेहकरवरून बस आली असता आरोपी भागवत बोडखे व आकाश काळे यांनी चालक शे.रफिक शे.कादर यांच्याशी वाद घालून तुम्ही एसटी बस उशिरा का आणली, या कारणावरून एसटी बसच्या काचा फोडल्या. चालकाच्या तक्रारीवरून उपरोक्त दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणण्यासोब तच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील त पास सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक नरोटे पुढील तपास करीत आहेत.
एसटीचे नुकसानोहकर आगारातून नेहमी बसफेर्या वेळेवर न जाण्याचे प्रकार घडतात. तसेच मेहकर येथे शिक्षणासाठी येणार्या मुलींनासुद्धा सायंकाळी घरी जाण्याकरिता वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील मुलींना रात्री अंधार पडल्यानंतरही बसस्थानकवर बसून बसची प्रतीक्षा करावी लागते. मेहकर तालुक्यातील शहापूर येथील बस वेळेवर न आल्याने काही प्रवाशांनी शहापूर येथे बसच्या काचा फोडल्या.
सर्व आगारामधून नियोजित वेळेवर बसफेरी सोडण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र जिल्ह्यात एसटीकडे वाहकांची कमतरता असल्याने काही बस वेळेवर पोहोचण्यास अडचणी जातात. - ए.यू. कच्छवे, विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा.