खामगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील शेगावसह जलंब येथील स्थानकात काही गाड्यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या भागातून मुंबई, राजस्थान, गुजरात, प. बंगाल, ओडिशा राज्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेगाव स्थानकात थांबणाऱ्या गाड्या२०८२३, पुरी-अजमेर सुपरफास्ट (द्वि-साप्ताहिक) २८ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून २२:०९ वाजता पोहोचणार आहे.
२०८२४, अजमेर-पुरी सुपरफास्ट (द्वि-साप्ताहिक) २९ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून १५.३४ वाजता पोहोचेल.१२४८५ हजूर साहिब नांदेड-श्री गंगानगर एक्स्प्रेस २८ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून १६.२९ वाजता पोहोचेल.
१२४८६ श्री गंगानगर-हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस २९ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून १६.०४ वाजता पोहोचेल.- जलंब स्थानकात थांबणाऱ्या गाड्या
१२८०९ मुंबई-हावडा मेल २६ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून ०५.४३ वाजता पोहोचेल.१२८१० हावडा-मुंबई मेल २६ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून १९.१३ वाजता पोहोचेल.
२०९२५ सुरत-अमरावती सुपरफास्ट (त्रि-साप्ताहिक) २७ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून १९.३३ वाजता पोहोचेल.
२०९२६ अमरावती-सुरत-सुपरफास्ट (त्रि-साप्ताहिक) २८ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या प्रवासापासून ११.१३ वाजता पोहोचेल.