खामगाव : सिंचनाची सुविधा असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता टरबुजाची शेती करण्याकडे वळले आहेत. शेकडो हेक्टरवर टरबुजांची लागवड करण्यात आली असून, गुजरात व दिल्लीला निर्यात करण्यात येत आहे. ट्रान्सपोर्ट खर्च वगळूनही शेतकर्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा भर गुजरात व दिल्लीकडे टरबुज पाठविण्यावर आहे.
विविध सिंचन प्रकल्प व विहिरींमध्ये पाणी असल्याने जिल्ह्यातील शिरला नेमाणे, अडगाव खुर्द, राहे, पिंपळखूटा, सावनी, पिंपळराव राजा, माटरगाव, वाडेगाव, या भागात टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ ७० ते ७५ दिवसांचे पीक असल्याने शेतकरी एका वर्षात तीन पिके घेवू शकतात. खरीप व रब्बी हंगामातील पिकांसह अनेक शेतकरी टरबुजाची लागवड करण्याकडे वळले आहेत. केवळ दोन ते अडीच महिन्यात शेतकर्यांना लाखो रूपयांचा फायदा होतो. त्यामुळे अनेक शेतकरी टरबुजांची लागवड करतात. उन्हाळ्यामध्ये टरबुजांना विशेष मागणी असते. जिल्ह्यात टरबुजांना ७ ते ८ रूपयांना मागणी आहे. तर गुजरात व दिल्लीमध्ये टरबूज पाठविले तर शेतकर्यांना १५ ते १६ रूपये प्रती टरबूज मिळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात टरबुजांची मागणी असल्याने ट्रक भरून शेतकरी टरबूजांची निर्यात करीत आहेत. दररोज ट्रकव्दारे टरबुजांची निर्यात करण्यात येत आहे.
एकरी ७० हजार रूपये खर्चटरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच टरबुजाची लागवड करण्याकरिता लागणारे बियाणे, खत व विविध साहित्याचे दरही वाढले आहेत. एका एकराकरिता जवळपास ७० हजार रूपये खर्च येतो. पीक कमी दिवसाचे असून टरबुजाला मागणी असल्याने शेतकरी लागवड करण्यावर भर देत आहेत.जिल्ह्यात तसेच आपल्या भागात टरबुजांची विक्री केली तर दर कमी मिळतो. मात्र गुजरात व दिल्लीला टरबुजांची निर्यात केल्यावर जास्त दर मिळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात टरबुजांची खरेदी करण्यात येते. शेतातून टरबुज गुजरातला पाठविण्यात येतात. शेतकर्यांना परवडत असल्याने अनेक शेतकरी निर्यात करण्यावर भर देत आहेत.- इश्वर पाचपोर टरबूज उत्पादक, शेतकरी
मल्चिंग पेपरचे दर वाढले मल्चिंग पेपरचेही दर वाढले -टरबुजाची शेती करण्याकरिता लागणार्या मल्चिंग पेपरचे दर वाढले आहेत. मल्चिंग पेपर पूर्वी १२०० रूपयांना मिळत होता तर आता १७५० रूपयांना मिळत आहे. महागाइ वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत टरबुजांच्या भावात वाढ झाली नाही. दरवर्षी खताच्या भावात वाढ होत आहे.