शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

'इको सायन्स पार्क'मध्ये वीज चोरीचा प्रकार उघडकीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 2:59 PM

संग्रामपूर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यातील आदिवासी ग्राम वसाळी येथे इको सायन्स पार्क या पर्यटक प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून यात वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यातील आदिवासी ग्राम वसाळी येथे इको सायन्स पार्क या पर्यटक प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून यात वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नियमावर बोट ठेवून चालणारी यंत्रणा नियमबाह्य काम करीत असल्याचे उघड झाले आहे.संग्रामपूर तालुक्यातील वसाळी येथील इको सायन्स पार्कमध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला. वीज वितरण कंपनीच्या पथकाने इको पार्क मधील वीजेची चोरी ६ डिसेंबर २०१८ रोजी पकडली. या पथकात उपकार्यकारी अभियंता एस.बी.नवलकर, सहाय्यक अभियंता राजेश राठोड, व सोनाळा वीज वितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता एस.एम.बोदडे यांचा सहभाग होता. सदर पथकाने ईको पार्कवर धाड टाकली, तेव्हा विद्युत पोलवरून बेकायदेशीरपणे सर्व्हिस लाईनची जोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. सर्व्हिस लाईनचा संबंध मिटरसोबत नव्हता. विद्युत पोलवरून सर्व्हिस लाईनच्या माध्यमातून डायरेक्ट उपकरणांना विद्युत पुरवठा जोडण्यात आल्याने बेकायदेशीरपणे विजेचा वापर करण्यात येत होता. वीज वितरण कंपनीकडून पकडण्यात आलेली वीजचोरी ही सर्वसामान्य नागरिकांकडून नाही, तर कायद्याच्या अधीन राहून काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या प्रकल्पात पकडण्यात आली होती. यात २ हजार ९८२ युनिट वीजचोरीचा ठपका वीज वितरण कंपनीकडून ठेवण्यात आला. वीज चोरीपोटी ७४ हजार ४८४ रुपये रक्कम आकारण्यात आली. त्यावर २० हजार रुपये दंड असे ९४ हजार ४०० रुपये आकारण्यात आले. ११ जानेवारी रोजी दंडाचा भरणा अमेय कंट्रक्शन कंपनीकडून आरटीजीएसच्या माध्यमातून भरण्यात आल्याचे वन्यजीव विभागाने सांगितले आहे. त्यामुळे ठेकेदारानेच वीज चोरी केल्याचे दंड भरल्यावरून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)

थकीत बील भरणार कोण?विज चोरी व्यतिरिक्त येथे करण्यात आलेल्या बहुतांश कामांमध्ये ठेकेदाराकडून गौडबंगाल तर करण्यात आले नाही ना, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. येथे ६२ हजार ८२४ युनिटचे ८ लाख ६६ हजार रूपये बिल थकित असल्याने वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला. एवढ्या मोठ्या रक्कमेचा भरणा कोण करेल, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदाराच्या कारनाम्याची शिक्षा मात्र वन्यजीव विभागाला भोगावी लागत आहे.

इको पार्कमध्ये वीजचोरी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. युनिटप्रमाणे वन्यजीव विभागाला बिल आकारण्यात आले असून दंडाच्या रकमेसह वसुली करण्यात आली आहे.- एस. एम. बोदडेकनिष्ठ अभियंता सोनाळा 

टॅग्स :khamgaonखामगावSangrampurसंग्रामपूरmahavitaranमहावितरणMelghatमेळघाट