बुलडाणा: जिल्हा परिषदमध्ये विविध संवर्गातील ३३२ पदे भरण्यात येत आहेत. सुरूवातीला आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी १६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती; आता या मुतदीमध्ये वाढ करण्यात आली असून २३ एप्रिलपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. जिल्हा परिषदमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आॅनलाईन होत असून त्यासाठी विविध विभागांतील रिक्त जागांची माहिती घेणे, आरक्षणांनुसार पदांची निश्चिती करून त्याचा अहवाल तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू झाली. २६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज भरण्याला सुरूवात झाल्यानंतर १६ एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतीम मुदत होती. राज्य शासनाच्या नियंत्रणात जिल्हा परिषदांची आॅनलाइन भरती प्रक्रिया प्रथमच होत आहे. बुलडाणा जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), पर्यवेक्षिका (अंगणवाडी), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी अशा विविध संवर्गातील ३३२ पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे.
मुदतवाढ अंतीमजिल्हा परिषद पदांसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत १६ एप्रिलवरून २३ एप्रिल करण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतीम राहणार असून, यानंतर कोणतीही मुतदवाढ दिली जाणार, नसल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे.