तालुक्यात महारचिकना, खळेगाव, खापरखेड, ब्राह्मणचिकना, खळेगाव कोनाटी, कारेगाव भुमराळा, वझर आघाव, सावरगाव तेली, किनगाव जटटू, चिखला, पिंपरी खंदारे, बिबी, मांडवा, चोरपांगरा, सहीत अनेक गावांत सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी मूग, उडिदासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक नजरेसमोर सुकून गेले आहेत. अती पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मूग, उडिदासह अनेक पिके सडून चालली आहेत. त्यामुळे हवे तसे उत्पन्न होणार नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. पाऊस जर थांबला नाही तर लावलेला खर्च ही निघणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे अति पावसामुळे नुकसान झालेल्या गावात ओला दुष्काळ तत्काळ जाहीर करावा, अशी मागणी सर्वच शेतकरी करत आहेत.
140921\img-20210914-wa0226.jpg
नुकसान ग्रस्त सोयाबीन