मेहकर : संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडलेल्या कोरोना विषाणूने आपल्या देशात मागील वर्षी याच महिन्यापासून आपले पाय पसरले होते. तेव्हापासून इतर सर्व यंत्रणासह आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी स्वतःच्या जीवाची, कुटुंबीयांची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे, काेविड याेद्धांना सुविधा देण्याची मागणी आराेग्य कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वेतन महिन्याचे एक तारखेस देण्यात यावे, कोविड केअर सेंटर करिता संपूर्ण स्टाफ ए.एन.एम. सहित नव्याने भरण्यात यावा, प्रा. आ. केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात येऊ नये, प्रत्येक प्रा. आ. केंद्राचे ठिकाणी एन.एच.एम अंतर्गत स्टाफ नर्स तत्काळ भरण्यात यावे, लसीकरण करिता ज्या ठिकाणी ए.एन.एम.ची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी सत्राप्रमाणे रोजंदारीवर ए.एन.एम. ची नेमणूक करण्यात यावी.कोविड लसीकरण बुथवर ड्रायरन मध्ये करून घेतल्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण जिल्हाभरात आयडी कार्ड व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन इन कोविड अप्लिकेशन, वाक्सीनेशन , पोस्ट वेक्सिंन ऑब्झर्वेशन , बुथ मॅनेजमेंट या करिता पाच पाच लोकांच्या इतर विभागासह ड्युटी लावण्यात याव्यात आदींसह इतर मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर एन.एल.धायडे, व्हि.बी.डोंगरे, एस.वाय.पराड, व्हि.टी.वायाळ, जी.बी.पाखरे,जे.एस.तडवी, डी,व्हि,इंगळे आदींची स्वाक्षरी आहे.